Woman scheme: केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवण्यात येत असतात. म्हणजेच सरकारद्वारे विशिष्ट वयोमर्यादा ठरवण्यात येते आणि त्यानुसार या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना देण्यात येतो. सरकार 18 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांना 5,000 रुपये मासिक पेन्शन देत आहे.
या योजनेत 18 ते 55 वर्षे वयोगटातील महिला सहभागी होऊ शकणार आहेत आणि त्यांना प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मिळू शकतात. ही योजना घटस्फोटित विधवा आणि निराधार महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे (Woman scheme) नाव मुख्यमंत्री एकल नारी सन्मान निवृत्ती वेतन योजना असे ठेवले गेले आहे.
अशा महिलांना चांगले जीवन जगता यावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे कारण या महिलांकदे कमाईचे दुसरे कोणतेही साधन उपलब्ध नसते. त्यामुळे या योजनेला सरकारकडून काही रक्कमही दिली जाते. या योजनेत सामील होण्यासाठी महिला अर्जदार स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
महिला योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती?
मुख्यमंत्री एकल नारी सन्मान अंतर्गत सरकारने सुरू केलेल्या पेन्शन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे (Woman scheme) आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मूळ रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते डायरीसह पासपोर्ट आकाराचा फोटो. याशिवाय महिलेचे उत्पन्नाचे प्रमाणपत्रही आवश्यक असणार आहे.
महत्त्वाच्या कागदपत्रांविषयी
विधवा निवृत्ती वेतनासाठी पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि घटस्फोटित महिला निवृत्ती वेतनासाठी न्यायालयाचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. उपविभागीय अधिकारी विकास अधिकारी प्रमाणपत्र हे परित्यक्ता महिला निवृत्ती वेतनासाठी आवश्यक आहे. वरील सर्व प्रमाणपत्रे ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करणे आवश्यक आहे.
योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
या योजनेत महिलांना (Woman scheme) ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. त्यानंतर सरकारकडून अर्जाची पडताळणी केली जाईल आणि तुम्हाला तुमच्या पेन्शनचा लाभ मिळेल. यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा लागणार आहे.
येथे वाचा – खुशखबर! शेतकऱ्यांनो अखेर डबल कर्जमाफी झाली, नवी यादी जाहीर, असं तपासा तुमचं नाव..