ladli behna yojana: 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या नजरा विधानसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट), आणि भाजप या सत्ताधारी महायुतीने आतापासूनच सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, सत्ताधारी महायुती महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री लाडली बहन’ योजना लागू होण्याची शक्यता आहे. जर ही योजना महाराष्ट्रात लागू केली गेली तर दरवर्षी सुमारे 15,000-20,000 कोटी रुपयांचा भार हा राज्याच्या तिजोरीवर पडेल.
लाडली बहन योजना (ladli behna yojana) लवकरच महाराष्ट्रात?
एका मराठी वृत्तपत्राने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या अहवालानुसार शिंदे सरकार लवकरच राज्यात ‘मुख्यमंत्री लाडली बहन’ योजना लागू करू शकते. निर्णय राज्यामधील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी घेण्यात येऊ शकतो. नुकतेच राज्य सरकारने सरकारी अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशात पाठवले होते.
याद्वारे मध्य प्रदेशातील लाडली बहन योजनेचा अभ्यास केला गेला. ही योजना कशी राबवण्यात येते? त्याचे योग्य स्वरूप काय आहे? या टीमने त्याचा अभ्यास केला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात या योजनेच्या (ladli behna yojana) प्रत्यक्ष अंमलबजावणीवर काम केले जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा पावसाळी अधिवेशनात ही योजना जाहीर होण्याची शक्यता आहे.
काय आहे मध्य प्रदेशातील ‘लाडली बहना योजना’?
मध्य प्रदेशातील तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याद्वारे लाडली बहन योजना सुरू केली गेली होती. या योजनेद्वारे मध्य प्रदेश सरकार कडून राज्यातील काही गरीब महिलांसाठी आर्थिक सहाय्य पुरवण्यात येते. मध्य प्रदेशात या योजनेने बरेच लक्ष वेधले. या योजनेमुळे शिवराज सिंह यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजय मिळवला.
महिला मतदारांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपने 29 पैकी 29 जागा जिंकल्या. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांची ही योजना (ladli behna yojana) महाराष्ट्रातही अमलात आल्यास त्याचा फायदा महायुतीला होईल, अशी आशा महायुतीतील घटक पक्षांनी केली असावी. त्यामुळे मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री लाडली बहन योजना लागू होऊ शकते.
योजना कशी असू शकते?
या योजनेअंतर्गत गरीब महिलांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामधे 90 ते 95 लाख दारिद्र्यरेषेखालील महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये मिळणे अपेक्षित आहे. या कार्यक्रमाचा (ladli behna yojana) लाभ 21 ते 60 वयोगटातील दारिद्र्यरेषेखालील महिला, विधवा, आणि घटस्फोटित महिलांना उपलब्ध आहे. ही रक्कम दरमहा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास सहाय्य करणे, हा यामागील उद्देश आहे.
येथे वाचा – ग्राहकांनो आता तुमचं क्रेडिट कार्ड वापरणं सुद्धा बंद! 1 जुलैपासून RBI चा हा नवा नियम होणार लागू!