दोन लाखांहून अधिक कर्जदारांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी कधी?

Crop loan: महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले, मात्र ज्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे ते अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याने शेतकरी चिंतातूर आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लगेचच सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले, मात्र त्याहून अधिक रकमेच्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी सरकार कोणतीही पावले उचलत नसल्याने शेतकऱ्यांचे व्याज वाढतच चालले आहे.

सध्याच्या पावसाळी अधिवेशनामधे सरकारने दोन लाखांच्या वरच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी (Crop loan) देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत तरतूद करून चालू पावसाळी अधिवेशनामधे त्याची घोषणा केली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

म्हाडाचा एक अर्जदार ठरला तब्बल चार घरांचा विजेता… जाणून घ्या सविस्तर..

हजारो शेतकऱ्यांवर जिल्हा बँकेचे सभासद आणि राष्ट्रीयकृत बँकांचे दोन लाख रुपयांहून अधिक कर्ज असून ते गेल्या पाच-सहा वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 2008 ते 2015 या कालावधीमधे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले होते.

सन 2016-17 मध्ये जिल्हा बँकेने कर्जात वाढ केल्याने बहुतांश शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने त्यांनी जुने कर्ज फेडून नवीन कर्ज घेतले. तथापि, सन 2016-17 मध्ये विद्यमान कर्जधारक म्हणून पीक कर्ज (Crop loan) घेतलेल्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी नाकारण्यात आली.

महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत 2016 ते 2019 या कालावधीत सरकार द्वारे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात आले. यामध्ये व्याजासह दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्यांना कर्जमाफी देण्यात आली. नाशिक जिल्ह्यात 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज (Crop loan) असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे कारण तेथे कांदा आणि द्राक्षे पिकवणारे शेतकरी जास्त आहेत.

म्हाडाच घर घेण्याआधी ही बातमी बघाच… विजेत्यांनी केला आरोप..

नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे आणि कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा फटका बसल्याने त्यांना कांदे आणि द्राक्षे अगदीच कमी भावाने विकावी लागली होती. या कारणाने जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. जिल्हा बँक वसुलीसाठी नोटीस बजावत आहेत.

परंतु जे शेतकरी 2 लाखांचे कर्ज फेडण्यास तयार आहेत, त्यांच्यासाठी सरकारने कोणतीही पावले उचललेली नाहीत. कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना कधी मिळणार कारण बँकेने कर्जाची वसुली सुरू केली आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सरकारने दोन लाखांवरील कर्ज (Crop loan) वसूल केल्यानंतर दोन लाखांची हमी घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांद्वारे केली जात आहे.

Leave a Comment