Vegetable prices : सध्या बाजारात फक्त भाजीपाल्याची चर्चा होताना दिसते. कारण बाजारात भाजीपाल्याची आवक होत नसल्याने अनेक भाज्यांचे दर शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पेट्रोलपेक्षा भाजीपाला महाग झाला आहे. आता नेमकं घरात काय शिजवायचं? असा मोठा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. सध्या भाजीपाल्याचे भाव पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. भाजीपाल्याची एक शेंग चक्क 20 रुपयांना मिळत आहे. चला तर मग सध्या भाजीपाल्याचे दर नेमके काय आहे? हे जाणून घेऊया..
मुंबईमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी 104.21 रुपये खर्च येतो. या दरात गेल्या 3 महिन्यांपासून काहीच बदल झालेला दिसत नाही. सध्या शेवग्याच्या शेंगाचा भाव 160 ते 200 रुपये प्रतिकिलो असा झाला आहे. शेवग्याची एक शेंग 15 ते 20 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे सध्या भाजीपाल्याचे हे दर सामान्य माणसाच्या खिशाला परवडत नाहीये. भेंडी आणि टोमॅटो (Tomato) 80 ते 100 रुपये किलो या दराने बाजारात विकले जात आहे. त्यामुळे नियमित भेंडी आणि टोमॅटो खाणार्यांचे मोठे हाल होणार आहे. कोथिंबीर देखील चांगलीच महागली आहे.
काय सांगता! आता लाईटपासून ते गॅस सिलिंडर पर्यंत सर्व काही मिळणार मोफत, येथे क्लिक करून पहा बातमी..
पहा भाजीपाल्याचे दर
(1) कोथिंबीर – 150 ते 200 रुपये जुडी, (2) शेवगा शेंग – 160 ते 200 रुपये किलो, (3) मोठी मेथी – 40 ते 80 रुपये भाव, (4) पालक – 25 ते 40 रुपये भाव, (5) पातीचा कांदा – 40 ते 60 रुपये भाव, (6) लहान मेथी – 40 ते 60 रुपये भाव
पीक कर्ज काढलेल्या शेतकर्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, येथे क्लिक करून पहा बातमी..