RBI New Rule: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) नवे नियम १ जुलैपासून लागू होणार आहेत. आरबीआयचे हे नवीन नियम क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतील. यामुळे बीबीपीएसद्वारे आता क्रेडिट कार्डचे सर्व पेमेंट करावे लागणार आहे. RBI ने पेमेंट इकोसिस्टममध्ये कार्यक्षमता आणि सुरक्षा सुधारण्यासाठी हे नियम लागू केले आहेत.
मिळालेल्या माहितीच्या अनुसार, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्ये 1 जुलैपासून लागू होणाऱ्या नियमांमुळे काही बदल केले जाणार आहेत. याचा परिणाम Infibeam, Avenues, PhonePe, BillDesk आणि Cred या सारख्या प्लॅटफॉर्मवर होताना दिसणार आहे. सध्या, 34 पैकी फक्त 8 बँकांनी क्रेडिट कार्ड (RBI New Rule) जारी करण्यासाठी BBPS वर बिल भरण्याची सुविधा सुरू केली आहे. यामध्ये एसबीआय कार्ड, बीओबी कार्ड, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, आणि फेडरल बँक यांचा समावेश झालेला आहे.
विशेष म्हणजे HDFC बँक, ICICI बँक आणि Axis सारख्या प्रमुख क्रेडिट कार्ड बँकांनी BBPS सक्षम केलेले नाही. PhonePe आणि Cred सारख्या बँका 30 जून नंतर क्रेडिट कार्ड पेमेंटद्वारे व्यवहारांवर प्रक्रिया करू शकणार नाहीत कारण या बँकांनी BBPS सक्रिय केले नाही. आतापर्यंत या बँकांद्वारे 5.1 कोटी रुपयांपर्यंतची क्रेडिट कार्डे जारी करण्यात आली आहेत. मात्र त्यांनी अद्याप बीबीपीएसची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
वास्तविक पाहता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI New Rule) आदेश दिले आहेत की 30 जूननंतरचे क्रेडिट कार्डद्वारे करण्यात येणारे सर्व पेमेंट हे भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारेच करण्यात यावे. हाती आलेल्या अहवालानुसार, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँक या बँकाद्वारे अद्याप बीबीपीएस सक्रिय केले गेलेले नाही. फक्त 8 बँकांद्वारे आत्तापर्यंत BBPS बिल पेमेंट सक्रिय केले गेले आहे.
एकात्मिक बिल पेमेंट सिस्टम म्हणून भारत बिल पेमेंट सिस्टम ओळखली जाते. ग्राहकांना या सिस्टीम द्वारे ऑनलाइन बिल पेमेंट सेवा प्रदान करण्यात येते. बिल पेमेंट करण्यासाठीचे हे एक इंटरऑपरेबल प्लॅटफॉर्म असल्याचे समजते. ही सिस्टीम NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच अंतर्गत कार्यरत आहे. UPI आणि RuPay प्रमाणेच, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारेच, BBPS हे देखील विकसित केले गेले आहे. याद्वारे सर्व बिले (RBI New Rule) ही एकाच प्लॅटफॉर्मवर भरता येऊ शकतात.
येथे वाचा – काय सांगता? या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानासह बियाणांचे वाटप झाले सुद्धा!