Monsoon Update : मान्सूनच्या पावसासंदर्भात हवामान विभागाकडून एक महत्त्वाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात नेमका कोणत्या भागात 100 टक्के पाऊस पडणार? हवामान विभागाने नेमकी काय माहिती दिली हे आपण जाणून घेणार आहोत. सध्या शेतकर्यांनी पेरणीची तयारी सुरू आहे. शेत तयार करण्यापासून ते बियाणे खरेदी करण्यापर्यंत अशी तयारी सध्या सुरू आहे. अशात आता मॉन्सून बद्दल मोठी अपडेट हाती आली आहे. मान्सून आता भारतामध्ये (Monsoon in India) दाखल झाला आहे. केरळात नेहमी 31 मे पर्यंत मान्सून दाखल होत असतो. पण यंदा मॉन्सून एक दिवस आधीच म्हणजेच 30 मे रोजी केरळात दाखल झाला आहे.
राज्यात या ठिकाणी 100 टक्के पाऊस
मॉन्सून केरळात आल्यानंतर दक्षिणेकडील राज्यांमधून गोवामार्गे मॉन्सून कोकणातून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होतो. मॉन्सूनचे आगमन केरळमध्ये झाल्यानंतर साधारण 8 ते 10 दिवसांनी मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होतो. यंदा मुंबईत मान्सूनचे आगमन 10 किंवा 11 जूनला दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात आता हवामान विभागाकडून मान्सूनच्या पावसाबद्दल काही महत्त्वाचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. हवामान विभागाने नाशिक, कोकण आणि चंद्रपूरमध्ये 100 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागामध्ये 95 टक्के ते 98 टक्के एवढा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. पुण्यात देखील 100 टक्के पावसाचा प्रमाण असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.(This year 100 percent rain will fall in this place)..
येथे वाचा – आता चार्जिंगचं टेंशन संपलं; सॅमसंगने आणल्या स्वस्तात दोन पॉवर बँक, पहा किंमत..!
कोणत्या महिन्यात पावसाचा खंड पडणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून-जुलै या महिन्यात पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. पण ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात चांगला पाऊस पडू शकतो, असा देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाला होता. त्यामुळे राज्यात बर्याच भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. धरण आणि तलावातील पाणी पूर्णपणे आटले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.