काय सांगता! सोयाबीनचे पीक धोक्यात, त्वरित करा ‘हा’ उपाय, नाहीतर उत्पादन होईल कमी..!

Soybean Farming : सोयाबीनचे पीक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची लागवड होते. राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशाचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य सर्वाधिक उत्पादन घेण्याच्या यादीत देशात दुसर्‍या क्रमांकावर येते. सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश राज्यात घेतले जात असून हे राज्य पहिल्या क्रमांकावर येते. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनापैकी तब्बल 45% एवढे सोयाबीन उत्पादन एकट्या मध्यप्रदेश राज्यात घेतले जाते आणि 40 टक्के एवढे उत्पादन आपल्या महाराष्ट्र राज्यात घेतले जाते.

यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे अर्थकारण सोयाबीन पिकावर अवलंबून आहे. मागील वर्षी सोयाबीनला खूपच कमी भाव मिळाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण असे असताना देखील

यंदा तरी सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी आशा ठेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची (Soybean Crop) पेरणी केलेली आहे. जर यंदा तुम्ही देखील सोयाबीन लागवड केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच कामाची ठरणार आहे. कारण सध्या सोयाबीन पिकावर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेकांचे सोयाबीन पीक पिवळे पडत असून याकडे दुर्लक्ष केल्यास सोयाबीन उत्पादनात मोठी घट होऊ शकते. त्यासाठी यावर काय उपाय करावा? आणि कोणती फवारणी करावी? याची माहिती येथे पाहूया..

अरे देवा, फक्त याच रेशन कार्ड धारकांना मिळणार 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा..

सोयाबीन पिवळे पडत असल्यास कोणती फवारणी करावी?

वारंवार शेतात पाणी साचने, शेत जमिनीत लोह, पालाश आणि नत्र अशा अन्नद्रव्यांची कमतरता असणे यामुळे सोयाबीन पिवळे पडते. तसेच सोयाबीन पिकात तणनाशकाची फवारणी केली असेल आणि त्याचे प्रमाण जास्त असेल तर याने देखील सोयाबीन पीक पिवळे पडते. त्यासाठी हा उपाय करा – (1) शेतात साचत असलेले पाणी शेताबाहेर काढा. (2) त्यासोबतच झिंक सल्फेट + फेरस सल्फेटची फवारणी करण्याचा सल्ला तज्ञ देतात. (3) जर तुमच्या सोयाबीन पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव असेल तर फवारणीमध्ये इमामेक्टिन घ्यावे. आणि महत्वाचे म्हणजे याचे प्रमाण 10 ग्रॅम प्रति पंप असे असावे. (4) तसेच 19-19-19 + मायक्रोन्यूट्रिऐन्ट याची फवारणी करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. खोडकीडीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर या फवारणीत इमामेक्टिन 10gm फवारावे.. तसेच फवारणी करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला आवश्य घ्यावा..

शेतकऱ्यांनो, खतांच्या किमतीत एवढ्या रुपयांची घसरण.. येथे क्लिक करून पहा नवीन दर..

Leave a Comment