Senior citizen saving scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत सरकारद्वारे, अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात, त्यापैकीच एक ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही देखील आहे. वृद्धांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक वरदान आहे.
ज्येष्ठ नागरिक म्हणजे कोण?
ज्या नागरिकांचे वय 60 ते 80 दरम्यानचे आहे, त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणले जाते. 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना सुपर ज्येष्ठ नागरिक (Senior citizen saving scheme) म्हणतात.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी खाते कसे चालू करावे?
तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या सहाय्याने खाते उघडून या योजनेमधे गुंतवणूक करू शकणार आहात. जवळपास सर्वच बँका या योजनेचा लाभ देत आहेत.
अरे देवा! आता फास्टॅग होणार बंद, स्वतः जाऊन भरावा लागणार टोल!
किती रक्कम जमा करू शकता
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमधे तुम्हाला जास्तीत जास्त 30 लाख रुपये जमा करता येणार आहेत. जर तुम्ही तुमच्या एकट्याचे खाते उघडत असाल तर तुम्हाला 9 लाख रुपये जमा करता येणार आहेत. पण याउलट, जर तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत संयुक्त खाते (Senior citizen saving scheme) उघडायचे असेल तर तुम्ही 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकणार आहात. खाते उघडण्याच्या तारखेपासून 5 वर्षांनंतर, जमा केलेली रक्कम मॅच्युर होते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर किती आहे?
तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत एकूण 5 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकणार आहेत. सध्या या योजनेत गुंतवलेल्या एकूण रकमेवर 8.2 टक्के व्याजदराने लाभ उपलब्ध असणार आहे. या योजनेमधे (Senior citizen saving scheme) तुम्ही 1,000 ते 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकणार आहात. या योजनेमधे तुमच्या खात्यावर तिमाही आधाराने व्याज जमा केले जाणार आहे.
आवास योजनेंतर्गत 3 कोटी नवीन घरांची बांधणी, फक्त याच नागरिकांना मिळणार घर!
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी पात्रता
ज्येष्ठ नागरिक संयुक्तपणे स्वतःहून किंवा आपल्या जोडीदारासोबत खाते उघडू शकतो.
या नियमांनुसार NRI आणि HUF कुटुंबे खाती उघडण्यास पात्र नाहीत.
असे व्यक्ती ज्यांचे वय 60 वर्षे (Senior citizen saving scheme) किंवा त्याहून अधिक आहे तेच यामधे खाते उघडू शकतात.
असे व्यक्ती जे ज्यांचे वय 55 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे परंतु 60 वर्षांपेक्षा कमी आहे आणि खाते उघडण्याच्या तारखेला सेवानिवृत्त किंवा VRS वर निवृत्त झाले आहेत.
पन्नास वर्षांवरील निवृत्त संरक्षण सेवा कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
तुम्हाला किती पैसे मिळतील?
समजा जर तुम्ही या योजनेमधे 10 लाख रुपये गुंतवले असतील, तर 1 लाख रुपयांवर तुम्हाला एका वर्षाला 8200 रुपये परत मिळतील. त्याचप्रमाणे तुमच्या 10 लाख रुपयांवर तुम्हाला, वार्षिक 82000 रुपये मिळणार आहेत. (Senior citizen saving scheme)
मॅच्युरिटीचे 5 वर्ष पूर्ण झाल्यावर, तुम्हाला 4 लाख 10 हजार रुपये फक्त व्याज दिले जाईल. यासोबतच 10 लाख रुपयांची मूळ रक्कम सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणजेच 5 वर्षानंतर एकूण 14 लाख 10 हजार रुपये तुम्हाला मिळतील. जर तुम्ही यामधे 5 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला 2 लाख 10 हजार रुपयाचे एकरकमी व्याज मिळणार आहे.
Definitely it’s helpful to aged disable Sr.citizens.
दहा लाख आणायचे कुठून? दरोडा घालायचा का? खासगी कंपनीतील सर्व सेवानिवृत्त कामगारांना गेली कित्येक वर्षे दरमहा फक्त रु.१०००/- किंवा त्याहूनही कमी पेन्शन मिळत आहे. त्याबद्दल कोणी काही बोलत नाही.
घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सध्या एक हजाराच्या आसपास आहे. महिन्याला एक गॅस सिलिंडर घेतला, तर खातील काय पेन्शनर्स?
डॉक्टर साहेब, तुम्हाला वाटतंय, तेवढं अपंग ज्येष्ठ पेन्शनर्सचं जिणं, अजिबात सोपं नाही. महिना हजार रुपयांत काय होतंय? तुमच्या पेशंटची देय बिलं तरी हजार रुपयांपेक्षा कमी आहेत? तुम्ही ज्येष्ठ पेन्शनर्सना देता सवलत? तुम्ही द्याल त्यांना दहा लाख? कृती करावी माणसानं, उगाच गप्पा मारु नयेत.
खेदाची बाब अशी आहे, की डॉक्टर, वकील अशी उच्चभ्रू माणसं सुद्धा, सामान्य माणसांची कड घेण्याऐवजी, सरकारचीच बाजू उचलून धरत आहेत!
माझे शब्द कदाचित बोचरे वाटतील, हे मी प्रांजळपणे कबूल करतो, पण तथ्य आहे त्यांत, हे तुम्हालाही मान्य होईल. मान्य नसेल, तर विषय सोडून द्या आणि अशीच सरकारची भलभलावण करीत रहा!
उदय स. गोखले,
डोंबिवली.