IDFC, HDFC सह 5 बँकांवर RBI ची बंदी, ग्राहकांच्या खात्याबाबत मोठा निर्णय!

RBI Action on Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने पाच बँकांवर निर्बंध लादले आहेत. खराब आर्थिक स्थितीमुळे RBI द्वारे देशातील पाच सहकारी बँकांवर बंदी घालण्यात आली आहे. आणि म्हणूनच या काही बँकांच्या ग्राहकांना बऱ्याच अडचणींमधून जावं लागणार आहे. हे ग्राहक खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. आरबीआयने घातलेल्या निर्बंधांमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढणे पूर्णपणे थांबले आहे.

बँक बंदी सहा महिने राहील

देशातील ढासळत चाललेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन RBI द्वारे काही सहकारी बँकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. ही बँक बंदी (RBI Action on Bank) सहा महिने कायम राहणार असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. या पाच बँकांच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यामधे जमा केलेले पैसे काढता येणार नाहीत.

तसेच, या बँकांना आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणालाही कर्ज देण्याची किंवा नवीन कर्ज घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करता येणार नाही. आरबीआय द्वारे (RBI Action on Bank) बंदी घालण्यात आलेल्या पाचपैकी तीन बँकांवर अंशतः ठेव काढण्याची बंदी आणि इतर दोन बँकांवर पूर्णरित्या बंदी घातली गेली आहे.

ग्राहकांच्या पैशाचे काय होणार?

दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या अनुसार, महाराष्ट्र बँकेच्या शिरपूर व्यापारी सहकारी बँकेत पैसे जमा करणारे ग्राहक विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत दावा करू शकणार आहेत. 5 लाखांपर्यंतची रक्कम ज्या ग्राहकांच्या खात्यात आहे अशा ग्राहकांना पूर्ण परतावा मिळू शकतो. दरम्यान, या बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे वृत्त आहे.

‘या’ बँकांवरील (RBI Action on Bank) बंदी कधी उठणार?

या निर्बंधांचे पुनरावलोकन केले जाईल, असे आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे. बँकांचे परवाने अद्याप रद्द झालेले नसल्याने या बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊन हे निर्बंधही काढता येतील. ज्या पाच सहकारी बँकांवर RBI द्वारे निर्बंध लादण्यात आले आहेत त्यापैकी एक बँक महाराष्ट्रातील देखील आहे.

आरबीआय (RBI Action on Bank) द्वारे या बँकांच्या व्यवहारांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. तुम्ही पुढील तीन बँकांमधून फक्त 5,000 रुपये काढू शकणार आहात, त्या बँका आहेत: शंकरराव मोहिते पाटील ही सहकारी बँक, अकलूज, महाराष्ट्र आणि उरवाकोंडा कोऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरवाकोंडा, आंध्र प्रदेश. याचाच अर्थ असा की ग्राहकाच्या बँक खात्यामधे कितीही रक्कम जमा केलेली असली तरी सुद्धा ग्राहकांना त्यांच्या खात्यातून केवळ 5,000 रुपयेच काढता येणार आहेत.

येथे वाचा – या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 जुलैपर्यंत जमा होणार पैसे! बघा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी

Leave a Comment