शेतकऱ्यांनो, या जिल्ह्यातील टोमॅटो चा भाव वधारला.., एक किलोसाठी मोजावे लागतायत तब्बल ‘इतके’ रुपये..

Tomato Rates: यावेळी टोमॅटोचे उत्पादक (Tomato Farmers) शेतकरी चांगला नफा कमावत आहेत. कारण टोमॅटोच्या दरात चांगलीच मोठी वाढ झाली असल्याचं बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यांमध्ये टोमॅटोचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रीचे दर झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, पुढच्या काही दिवसांत टोमॅटोच्या किमतीत अजून वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे.

वाढलेल्या भावातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो

सध्या टोमॅटोचे भाव (Tomato prices) वाढत आहेत. दर वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, या वाढणाऱ्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अधिक ताण पडत असल्याचं दिसून येत आहे. बटाटे आणि कांद्यापाठोपाठ आता टोमॅटोचेही भाव वाढू लागले आहेत. अलीकडच्या काळात टोमॅटोचे किरकोळ भाव झपाट्याने वाढले आहेत. सध्या टोमॅटोचा भाव 80 रुपये किलोवर पोहोचला आहे. पावसामुळे टोमॅटोचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

4 नाही तर आता 10 जुलै पासून LPG गॅस सिलेंडर दरात तब्बल एवढ्या रुपयांची घसरण… पाहा आजचे नवे दर..

सरकारी आकडेवारीनुसार टोमॅटोचे भाव काय आहेत?

सरकारी आकडेवारीनुसार बघितलं तर टोमॅटोच्या दरात तशी फारशी काही वाढ झालेली दिसून येत नाही. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारी च्या अनुसार, 3 जुलै रोजी टोमॅटोची सरासरी दररोजची किरकोळ किंमत 55 रुपये प्रति किलो होती. महिनाभरापूर्वी त्याची किंमत 35 रुपये किलो इतकी होती.

टोमॅटोचे भाव (Tomato Rates) का वाढत आहेत?

टोमॅटोचे भाव अचानक वाढण्याचे कारण म्हणजे अतिवृष्टी. मान्सूनच्या आगमनानंतर गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस पडल्याच चित्र आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये टोमॅटोचा पुरवठा विस्कळीत झाला असल्याचं दिसून येत आहे. हिमाचल प्रदेशात अनेक रस्ते खराब झाले आहेत. अनेक किरकोळ बाजारांमध्ये, या अश्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे, हिमाचल प्रदेशातून होणारा टोमॅटोचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे दर वाढत आहेत.

या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली 25 टक्के पीक विम्याची रक्कम.. यादी पहा..

अतिवृष्टीमुळे टोमॅटो पिकालाही फटका बसला

अतिवृष्टीमुळे (heavy monsoon) टोमॅटो पिकालाही नुकसान पोहचू शकते. याचाच अर्थ आगामी काळात टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. दरवर्षी टोमॅटोचे भाव हे पावसाळ्यात वाढल्याच बघायला मिळतं. गेल्या वर्षी परिस्थिती फारच बिकट झाली होती आणि त्यामुळे टोमॅटोचा भाव 350 रुपये किलोपर्यंत गेला होता. यानंतर सहकारी संस्थांच्या मदतीने सरकारने अनेक शहरांमध्ये टोमॅटोची विक्री सवलतीच्या दरात सुरू केली होती.

Leave a Comment