PM Kisan Yojana: शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असल्याचं दिसून येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान (PM Kisan Yojana) योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यावर 5 ऑक्टोबर 2024 रोजी जमा होणार आहे! गेल्या काही महिन्यांपासून सर्व शेतकरीजण या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता वितरित केला जाईल. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देण्यात आली आहे, आणि त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या श्रमांचा योग्य सन्मान
या योजनेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत मिळते, जी तीन हप्त्यांमध्ये त्यांच्या खात्यावर जमा केली जाते. शेतकरी जिथे रब्बी हंगामात पेरणी आणि खरीप हंगामातील सुगीच्या कामांमध्ये राबत असतात, तिथे ही रक्कम (PM Kisan Yojana) सर्वच शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरते.
शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! या तारखेला होणार कापूस, सोयाबीन अनुदानाचे वितरण..
18 व्या हप्त्याची प्रतीक्षा
17 व्या हप्त्याची रक्कम जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. तेव्हापासून सर्व शेतकरी या 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. आता, ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. हे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
ई-केवायसी
शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे. तुमची ई-केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया तुम्ही पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन पूर्ण करू शकता. तुमचा मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून ही केवायसी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा. जर तुमची केवायसी पूर्ण नसली, तर तुमच्या हक्काची रक्कम तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणूनच, ही प्रक्रिया तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा.
शेतकर्यांनो! पीक विमा झाला मंजूर; पहा तुम्हाला मिळणार का?
पीएम किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेण्यासाठीच्या सोप्या स्टेप्स:
यासाठी सगळ्यात आधी www.pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
त्यांनतर तुमचं शहरी किंवा ग्रामीण क्षेत्र निवडा.
यापुढे आधार क्रमांक, फोन नंबर, आणि राज्य निवडा.
त्यानंतर तुमच्या जमिनीशी संबंधित माहिती भरा.
जमिनीचे कागदपत्रं अपलोड करा आणि कॅप्चा कोड नोंदवा.
त्यानंतर ‘गेट ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करून मोबाईल वर येणार ओटीपी भरुन तुमचा अर्ज सादर करा.