Mukhyamantri Ladki Bahin Yojana: राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. लाडकी बहिन योजना, ही योजना सुद्धा त्यापैकीच एक असून, या योजनेच्या शासन निर्णयानुसार (GR) 01 जुलै ते 15 जुलै या कालावधीत या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. आत्तापर्यंत, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पोर्टलवर कोणतेही अर्ज, किंवा त्याबाबतची माहिती प्रकाशित केली गेलेली नाही. तांत्रिक अडचणींमुळे हे पोर्टल बदलले जाऊ शकते आणि त्यानंतर या पोर्टलद्वारे तुम्हाला अर्ज करता येणार आहेत.
लाडकी बहिन योजनेबाबत घेतल्या गेलेली शासन निर्णयानुसार 01 जुलै रोजी या योजनेसाठी महिलांना अर्ज करता येऊ शकतो, असे सांगण्यात आले होते. मात्र आत्तापर्यंत, ऑनलाइन अर्ज लिंक, पोर्टल किंवा अर्जाचा उल्लेख कुठेही केला गेलेला नाही. याउलट या योजनेसाठी (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) अर्ज करण्यासाठी जी वेळ दिली गेली आहे ती खूपच कमी असल्याने आणि या अडचणींमुळे अर्जाची मुदत वाढवणे अपेक्षित आहे.
अरे देवा, फक्त याच रेशन कार्ड धारकांना मिळणार 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेमधे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी सगळी आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित पद्धतीने तयार करून ठेवा, जेणेकरून ऑनलाइन अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला लगेचच अर्जाची नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सुरू केल्यानंतर, तुम्हाला अर्ज कुठे करावा लागेल आणि हा अर्ज कसा भरायचा याबद्दल सगळी माहिती अगदी सविस्तर रित्या देण्यात येईल.
लाडकी बहिन योजनेसाठी (Mukhyamantri Ladki Bahin Yojana), ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, तसेच पोर्टल आणि अर्ज अद्याप प्रसिद्ध जरी झाले नसले तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाने या योजनेसाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे तयार करून ठेवण्यास सांगितले आहे. तसेच या बाबतीत अधिक माहिती घेण्यासाठी अंगणवाडी सेविका यांच्याशीही संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा केले गेले आहे.
येथे वाचा – शेतकऱ्यांनो अवघ्या 2 रुपयांत मिळणार वीज… आता 24 तास बिनधास्त वापरा वीज..