Onion Rates : कांद्याचे उत्पादन घेणार्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. बर्याच दिवसांपासून खालच्या दिशेला जाणारे कांद्याचे दर आता वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याचा लिलाव 25 जूनला राज्यातील 44 बाजार समित्यांमध्ये पार पडला. यातील 34 बाजार समित्यांमध्ये 3000 ते 4200 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे. यातील एकाही बाजारामध्ये 2500 रुपये प्रति क्विंटलपेक्षा भाव कमी नव्हता. सध्या कांद्याची आवक कमी असल्यामुळे कांद्याच्या दरात वाढ होत असल्याचं बोललं जात आहे. कोणत्या बाजारात 4 हजार रुपयांपेक्षा जास्त दराने भाव मिळतोय? याची माहिती जाणून घेऊया..
सध्या राज्यात कांद्याचे दर (Onion Rates) रोज नवनवीन विक्रम करताना दिसून येत आहे. सध्या राज्यात काही बाजारात कांद्याचे भाव 4200 रुपये प्रतिक्विंटलवर जाऊन पोहोचले आहेत. कांद्याला नागपूरच्या रामटेक बाजारात 25 जूनला किमान 4 हजार रुपये प्रतिक्विंटलचा विक्रमी दर मिळाला आहे. तसेच कमाल दर हा 4200 रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण भाव 4100 रुपये प्रतिक्विंटल असा होता. महत्त्वाचं म्हणजे या बाजारात 25 जूनला कांद्याची आवक कमी होती.
पीक कर्ज काढलेल्या शेतकर्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, येथे क्लिक करून पहा बातमी..
मोठ्या बाजारात कांद्याची आवक झाली कमी (Onion Market)
केंद्र सरकारकडून 7 डिसेंबर 2023 पासून लागू करण्यात आलेली कांदा निर्यातबंदी 4 मे ला उठवण्यात आली होती. त्यानंतर कांद्याची निर्यात केली जात होती. त्यामुळे देशांतर्गत असलेल्या बाजारपेठेतील आवक कमी झाली. कांद्याची आवक कमी होत असल्याने भाव वाढले आहेत. यंदा राज्यात कांद्याचे उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला आहे. याच कारणामुळे दरात वाढ होत असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यातील मोठ्या बाजार समित्यांमधील आवक पुढीलप्रमाणे – (1) पिंपळगाव-बसवंत – 18000 क्विंटल आवक, (2) लासलगावमध्ये – 11328 क्विंटल आवक, (3) लासलगाव-विंचूरमध्ये 12500 क्विंटल आवक, (4) सोलापुरात 11793 क्विंटल आवक
अरे वा! आता ‘या’ नागरिकांना मोफत उपचार; येथे क्लिक करून पहा बातमी..
कांद्याला बाजारात मिळतोय एवढा दर
(1) पुणे : कमीत कमी भाव – 1200 रुपये, तर जास्तीत जास्त भाव – 3000 रुपये.
(2) अकोला : कमीत कमी भाव – 2000 रुपये, तर जास्तीत जास्त भाव – 3400 रुपये.
(3) पिंपळगाव : कमीत कमी भाव – 2700 रुपये तर जास्तीत जास्त भाव 1700 रुपये
(4) राहुरी : कमीत कमी भाव – 2301 रुपये, जास्तीत जास्त भाव – 2326 रुपये तसेच उच्च प्रतीचा कांदा भाव – 4313 रुपये प्रति क्विंटल.