RBI Alert: केंद्र सरकारद्वारे मध्यंतरी 2000 रुपयांच्या नोटांबाबत एक चांगलीच मोठी घोषणा करण्यात आली होती. त्या घोषणेच्या अनुसार दोन हजार रुपयांच्या नोटांचे चलन बंद करण्याचा निर्णय घेतला गेला होता. 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या मूल्याच्या सर्व नोटा बँकांमध्ये जमा करणे आवश्यक होते.
RBI द्वारे (RBI Alert) बँकांना 2,000 रुपयांच्या नोटा जारी करणे तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले होते. मात्र यासोबतच आता RBI द्वारे 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांसाठी देखील एक अपडेट जारी करण्यात आले आहे. तुमच्याकडे देखील जर या लहान किमतीच्या नोटा असतील तर तुम्ही काय कराल?
शेतकऱ्यांनो अवघ्या 2 रुपयांत मिळणार वीज… आता 24 तास बिनधास्त वापरा वीज..
आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा
पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये सुद्धा असे लिहिले होते की, जर तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या जुन्या किंवा फाटलेल्या नोटा बदलून घ्यायच्या असतील तर आता तुम्ही ते अगदी सहजपणे करू शकणार आहात. बँकेने सूचित केले आहे की यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेसोबत संपर्क साधून या नोटा (RBI Alert) बदलून घेऊ शकता. याठिकाणी तुम्हाला नोटा तसेच नाणी सुद्धा बदलून मिळणार आहेत.
रिझर्व्ह बँकेद्वारे जारी करण्यात आलेले नियम
आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, तुमच्याकडे जुन्या किंवा फाटलेल्या नोटा असतील तर तुम्हाला आता त्याची अजिबात चिंता करण्याची गरज असणार नाही. आता तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेमधे जाऊन या नोटा बदलू शकणार आहात. बँकेच्या (RBI Alert) कर्मचाऱ्याने जर तुमच्या नोटा बदलून घेण्यासाठी नकार दिला असल्यास तुम्ही त्याबाबत तक्रार सुद्धा करू शकता. मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की नोटेची स्थिती जितकी वाईट असेल तितकीच तिची किंमत देखील कमी कमी होत जाईल.
अर्रर.. फक्त याच शेतकऱ्यांचे दोन लाखांचे कर्ज होणार माफ… सरसगट कर्जमाफी नाहीच..
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, फाटलेल्या नोटांचा एक भाग गहाळ झाला असेल किंवा त्या नोटेचे दोन भागांपेक्षा जास्त भाग झालेले असतील तरच अशा नोटा स्वीकारल्या जातील. जर हा नोटांमधील काही विशेष महत्वाचे भाग गहाळ असतील, जसे की जारी करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव, हमी आणि वचन खंड, अशोक स्तंभ, स्वाक्षरी, वॉटरमार्क, महात्मा गांधींचे चित्र यापैकी काहीही गहाळ झालेले असेल तर तुमची (RBI Alert) नोट बदलून देण्यात येणार नाही. बाजारातील चलनामुळे, बर्याच काळापासून उपयोगात असल्याने निरुपयोगी ठरलेल्या नोटा देखील बदलल्या जाऊ शकतात.
येथे वाचा – दुचाकीस्वारांनो सावधान! गाडी घेऊन बाहेर पडाल तर भरावा लागेल 25 हजारांचा दंड.. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..