MHADA Lottery 2024: विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी सोडतपूर्व प्रक्रिया सुरू करण्याचा मुंबई मंडळाचा प्रयत्न असून, मुंबई मंडळाने सध्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी केली आहे. ही जाहिरात येत्या महिनाभरात प्रसिद्ध करून ऑगस्टपासून अर्जाच्या विक्री स्वीकृती ला सुरुवात करण्याची मंडळाची योजना आहे.
सोडतीत सुमारे दोन हजार घरांचा समावेश करण्यात येणार असून, मागील सोडतीतील उर्वरित घरांसाठी दिंडोशी, गोरेगाव, कोपरी (पवई), मालाड, कन्नमवार नगर (विक्रोळी) आदी भागातील घरांसाठी सोडत काढली जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे अत्यल्प आणि अल्प गटासाठी 2023 च्या घरांची सोडत होती. त्यामुळे आगामी सोडत (MHADA Lottery 2024) ही लहान, मध्यम आणि उच्च गटांसाठी असेल. अत्यल्प गटासाठी यावेळी कमी घरे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या डोक्याला ताप! SBI, HDFC सह या बँकांच्या कार्ड वापराच्या नियमात बदल..
कोपरी, पवई येथे बांधकामाधीन 426 उच्च आणि मध्यम श्रेणीची घरे आणि पहाडी गोरेगावमधील पंचतारांकित प्रकल्पांमधील 332 (मध्यम आणि उच्च) घरे देखील सोडतीमध्ये समाविष्ट आहेत. अशा प्रकारे, या गटातील उमेदवारांना या वर्षी स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची चांगली संधी आहे.
सूत्रांनी सांगितले की, मंडळाच्या प्रस्तावानुसार सुमारे दोन हजार घरांची सोडत 2024 मध्ये काढण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष मिलिंद बोरीकर यांनी याला दुजोरा दिला. या सोडतीमध्ये (MHADA Lottery 2024) जास्तीची घरे ही मध्यम, अल्प, आणि उच्च वर्गासाठी असणार असून, तर कमी घरे ही अत्यल्प गटासाठी असणार आहे, असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजून येत आहे.
शेतकऱ्यांनो सावधान, जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार..
426 घरांचा प्रकल्प पवई तलावाजवळ कोपरी येथे आहे. त्यापैकी मध्यम गटातील 333 घरे तर उच्च गटातील 93 घरे आहेत. गोरेगाव पहाडी मधे एकूण 332 घरे आहेत, ज्यामध्ये 227 उच्च गटातील घरे आणि 105 मध्यम गटातील घरे आहेत. 85 टक्के काम कोपरी प्रकल्पाचे पूर्ण झाले असून या घरांना डिसेंबरमध्ये निवासी प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. गोरेगावमधील 65 टक्क्यांहून अधिक घरांचे काम पूर्ण झाले असून या घरांना काम पूर्ण झाल्यानंतर मार्च 2025 मध्ये निवासी प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे.
या दोन्ही प्रकल्पांच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा बोर्डाने केला आहे. या सोडतीत कन्नमवार नगरमधील कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय घरे आणि कोपरी आणि पहाडीतील घरे आहेत. त्यामुळे 2023 मधील अत्यल्प आणि अल्पसंख्याक गटातील काही घरे देखील सोडतीमध्ये समाविष्ट केली जातील. त्याच वेळी, 2023 च्या सोडतीमध्ये (MHADA Lottery 2024) समाविष्ट असणारी गोरेगावमधील PMAY ची उर्वरित 88 घरांचा देखील समावेश केला जाईल. या सोबतच मालाड, दिंडोशी, आणि तारदेव याठिकाणच्या उर्वरित साडेसात कोटींच्या घरांचा समावेश सुद्धा यामधे केला जाणार आहे.
येथे वाचा – मुंबईकरांनो deposit तयार ठेवलंय ना? मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी म्हाडाच्या घरांची सोडत सुरू..