मुंबईकरांनो, अखेर मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण.. म्हाडाच्या घरांची लॉटरी जाहीर..

MHADA Lottery 2024: आपल्यापैकी बऱ्याच जणांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न असते. आता हे स्वप्न पाहणाऱ्यांसाठीच एक उत्तम बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. यावेळी दिवाळी सणाच्या मुहूर्तावर म्हाडाद्वारे अनेक घरांची सोडत काढण्यात येणार असल्याचे समजून येत आहे. यामध्ये बऱ्याच घरांचे फ्लोअर प्लॅन तयार केले जातील. म्हाडाद्वारे पहिल्यांदाच मध्यम तसेच उच्च उत्पन्न गटासाठी सुद्धा उच्च दर्जाच्या सुविधांसह घरे बांधली जात आहेत. मात्र, या आलिशान आणि परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडा किती शुल्क आकारणार आहे? याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती अजूनतरी मिळालेली नाही.

म्हाडाद्वारे येत्या दिवाळीमधे घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाचा हा पहिलाच हायफाय प्रकल्प असणार आहे. गोरेगावच्या रेल्वे स्थानकापासून अगदी पाचच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या या प्रकल्पामधे स्विमिंग पूल, जिम आणि क्लब हाऊससारख्या उत्कृष्ट सुविधा दिल्या गेल्या आहेत. या घरांसाठी मध्यम तसेच उच्च उत्पन्न गटातील लोक सुद्धा अर्ज करू शकणार आहेत.

शेतकऱ्यांनो, कापसासाठी वापरा हे तणनाशक, तणांचा प्रादुर्भाव कधीच होणार नाही..

गोरेगावच्या प्रेमनगरमध्ये 39 मजली गगनचुंबी बिल्डिंग बांधकाम जोरात सुरू आहे. सध्या 39 मजले पूर्ण बांधून झाले आहेत. हा प्रकल्प मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट म्हाडाने (MHADA Lottery 2024) ठेवले आहे. मात्र, या बिल्डिंग च्या कामाचा वेग पाहता हा येत्या दिवाळीपर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

तुम्ही अजून म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी केली नसेल तर आताच ही नोंदणी तुम्ही करून घ्या. कारण लॉटरी जाहीर केल्या गेल्या नंतर तुम्हाला फॉर्म भरायच्या आधी नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतरच तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकणार आहात. तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकत नसल्यास, तुम्ही वर दिलेल्या नंबरवर कॉल करून आणि सेवा शुल्क भरून फॉर्म भरू शकता.

शेतकऱ्यांनो पुढील ४८ तास धोक्याचे, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, IMD चा या भागांसाठी धोक्याचा इशारा..

अर्जासाठी (MHADA Lottery 2024) आवश्यक असणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत:

पॅन कार्ड
कॅन्सल चेक
आधार कार्ड
पत्ता पुरावा
जन्म प्रमाणपत्र
आयडी फोटो
अर्जदाराचे संपर्क डिटेल | MHADA Lottery 2024

येथे वाचा – काय सांगता, फक्त 300 रुपयात मिळणार गॅस सिलिंडर.. 1 जुलै पासून नवीन नियम लागू..

Leave a Comment