Mhada Lottery Mumbai : मुंबई सारख्या महानगरात भाड्यावर घर घेऊन राहणे फारच कठीण आहे. त्यामुळे मुंबईत हक्काचा फ्लॅट (1BHK Flat Mumbai) असणे किती महत्वाचा आहे हे लक्षात येते. अशात आता म्हाडाने सामान्य लोकांचे घराचे स्वप्न (Dream Home) पूर्ण करण्यासाठी 2,030 घरांची लॉटरी आणली आहे. सामान्यांना किफायतशीर दरात घरे उपलब्ध करून दिली जात आहे. म्हाडाच्या या घरांसाठी 9 ऑगस्ट पासून अर्ज सुरू झाले असून यासाठी 4 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. म्हाडाची ही घरे विक्रोळी, मालाड, गोरेगाव, पवई आणि वडाळा याठिकाणी आहे.
म्हाडाच्या घरांच्या किमती
येथे क्लिक करून पहा
वार्षिक उत्पन्नावर मिळणार म्हाडाचे घर (Mhada Flats)
म्हाडाच्या नियमानुसार ज्या लोकांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न सहा लाख एवढे आहे असे लोक ईडब्ल्यूएस (EWS) श्रेणीमध्ये अर्ज करू शकतात.
तसेच ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख ते नऊ लाखाच्या मध्ये आहे, असे लोक एलआयजी (LIG) श्रेणीच्या अंतर्गत अर्ज करू शकतात
ज्या लोकांची कौटुंबिक उत्पन्न नऊ लाख ते बारा लाखाच्या मध्ये आहे असे लोक एमआयजी (MIG) श्रेणीच्या अंतर्गत अर्ज करू शकतात
आणि ज्या लोकांचे कौटुंबिक उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त आहे असे लोक एचआयजी (HIG) श्रेणीच्या अंतर्गत अर्ज करू शकतात.
म्हाडाच्या घरांच्या किमती
येथे क्लिक करून पहा
म्हाडाच्या या 2024 मधील लॉटरीमध्ये मध्यम वर्गासाठी सर्वाधिक घरे आहेत, ज्यात जवळपास 768 एवढे अपार्टमेंट आहे. त्या खालोखाल एलआयजी या उत्पन्न गटात सर्वाधिक घरे आहेत. तसेच ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 359 अपार्टमेंट तर एचआयजी (HIG) श्रेणीसाठी 276 घरे आहेत. या घरांच्या किंमती खालील लिंक वर क्लिक करून पहा.
म्हाडाच्या घरांच्या किमती
येथे क्लिक करून पहा
दरम्यान या वेळेच्या म्हाडा लॉटरीत असलेल्या घरांच्या किमतीत मोठा बदल पाहायला मिळतोय. कारण यावेळी घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. असे असले तरी खाजगी बिल्डरांच्या घरांच्या किमतीच्या तुलनेत म्हाडाच्या घरांच्या किमती कमी आहेत. म्हाडाच्या घरांच्या किमती काही ठिकाणी कोटीच्या घरात आहेत. खालील लिंक वर क्लिक करून घरांच्या किमती पहा..