Mhada Lottery 2024: म्हाडा नेहमीच आपल्यासाठी स्वप्नातील घरं साकारण्याचा प्रयत्न करत आलंय, आणि यंदाच्या कोकण मंडळाच्या योजनांनी हे स्वप्न अजून जवळ आणलं आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळानं नुकतीच 2030 घरांची सोडत जाहीर केली होती, ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. आता म्हाडाच्या कोकण मंडळानं तब्बल 12,226 घरांसाठी दोन मोठ्या योजनांची घोषणा केली आहे, ज्यामुळे अनेकांना घरं खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
दोन आकर्षक योजना
या योजनेतून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come, First Serve) विक्री योजना आणि सदनिका विक्री सोडत जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या योजनेत (Mhada Lottery 2024) तब्बल 11,187 घरं उपलब्ध असतील, तर दुसऱ्या योजनेत 1,439 घरांची विक्री होणार आहे. या योजनांमुळे घरांसाठी वाट पाहणाऱ्या असंख्य कुटुंबांची स्वप्नं पूर्ण होणार आहेत.
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या 6294 घरांची लॉटरी.. सोलापूर, कोल्हापूर, सांगलीतही घरं मिळणार!
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना
या योजनेत प्रधानमंत्री आवास योजना, एकात्मिक गृहनिर्माण योजना, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आणि कोकण मंडळातील विखुरलेल्या सदनिकांचा समावेश आहे. यामध्ये प्रमुखतः प्रधानमंत्री आवास योजनेतील 9,883 घरं उपलब्ध असतील, तर एकात्मिक गृहनिर्माण योजनेत 512 घरं, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत 661 घरं, आणि कोकण मंडळातील 131 सदनिकांचा समावेश आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, ऑनलाईन अर्ज दाखल करून त्याच दिवशी शुल्क भरण्याची सोय उपलब्ध असेल. यासाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची नावं प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला सायंकाळी 6 वाजता जाहीर करण्यात येतील. जोपर्यंत घरं उपलब्ध आहेत, तोपर्यंत ही योजना (Mhada Lottery 2024) सुरू राहील.
अरे व्वा! कापूस सोयाबीन अनुदान यादी जाहीर, असे तपासा यादीतील नाव!
सदनिका विक्री सोडत योजना
ही योजना त्या लोकांसाठी आहे ज्यांना थोडं अधिक संयम ठेवून घरांची वाट पाहावी लागणार आहे. या योजनेत सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील 594 घरं, कोकण मंडळातील 607 सदनिका, कोकण मंडळ अंतर्गत 117 भूखंड आणि पत्रकारांसाठी 121 सदनिकांची विक्री केली जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, सोडत 27 डिसेंबर रोजी काढली जाणार आहे.
अर्ज कसा आणि कुठं करायचा?
तुम्ही म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करायचा असेल, तर तुमच्यासाठी दोन वेबसाइट्स आहेत:
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना: https://lottery.mhada.gov.in
सदनिका विक्री सोडत योजना (Mhada Lottery 2024): https://housing.mhada.gov.in
या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपलं हक्काचं घर मिळवायचं असेल तर आजच अर्ज करा!