म्हाडाच घर घेताय? ही कागदपत्रे ठेवा तयार.. अन्यथा मिळणार नाही घराचा ताबा..

MHADA Mumbai Lottery 2024: म्हाडाने (MHADA) गृहनिर्माण प्रकल्पांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ केली आहे. याआधी म्हाडाच्या घरांसाठी तब्बल 21 विविध प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता होती. मात्र आता फक्त 5 कागदपत्रे भरावी लागणार आहेत. त्यामुळे घरे वाटपापासून ते प्रत्यक्ष ताबा मिळण्यापर्यंतच्या प्रक्रियेत आता बराच वेळ वाचणार आहे.

तुम्हाला ही कागदपत्रे म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केल्यानंतर आणि लॉटरी (MHADA Lottery) जिंकल्यानंतर काही दिवसांतच म्हाडाकडे जमा करणे आवश्यक असते. या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच संबंधित विजेत्याला घराच्या ताब्याचे पत्र देण्यात येते. मात्र, अपूर्ण कागदपत्रांमुळे, घरे मंजूर झाल्यानंतर सुद्धा काही अर्जदारांना घराचा ताबा देण्यात आला नव्हता.

दोन लाखांहून अधिक कर्जदारांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी कधी?

तुम्ही जर लॉटरी जिंकली आणि तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता करणे जमलं नाही तर अश्याने संबंधित व्यक्ती अपात्र ठरेल. तसेच अनेक घरे या कारणाने रिकामी सुद्धा पडून आहेत. म्हाडाने ही गोष्ट लक्षात घेता कागदपत्रांची संख्या 21 वरून कमी केली आहे. ऑनलाइन सुविधेमुळे आता अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी लवकर करता येणार आहे. डीजी लॉकरमध्ये ही कागदपत्रे ठेवण्यात येतील. अर्जदाराला एसएमएस आणि ईमेलद्वारे घराची माहिती दिली जाते.

लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

1) आधार कार्ड (मोबाईल नंबरशी लिंक केलेले)
2) पॅन कार्ड (मोबाईल नंबरशी लिंक केलेले)
3) बारकोड किंवा आयटीआर मूल्यांकन वर्ष 2023-2024 सह उत्पन्न प्रमाणपत्र वर्ष 2022-2023
4) रहिवासी प्रमाणपत्र 1 जानेवारी 2018 नंतर जारी केले पाहिजे.
5) विवाहित असल्यास पती / पत्नीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड

म्हाडाचा एक अर्जदार ठरला तब्बल चार घरांचा विजेता… जाणून घ्या सविस्तर..

आरक्षण प्रमाणपत्र

# आरक्षित जागांच्या बाबतीत, खालील प्रमाणपत्रे आवश्यक आहेत.

1. SC/ST/NT/DT जात प्रवर्ग प्रमाणपत्र अपलोड केले जाऊ शकतात. सक्षम प्राधिकाऱ्याने मंजूर केलेले प्रमाणपत्र

2. पत्रकार
पत्रकाराची आवश्यक कागदपत्रे लॉटरीत certificate generation पर्यायाद्वारे अपलोड केली जावीत आणि त्याची पात्रता मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याद्वारे सुनिश्चित केली जाईल.

3. फ्रीडम फायटर लॉगिनमधील पर्यायाचा वापर करून नवीन प्रमाणपत्र तयार करता येईल आणि त्यांनतर सक्षम अधिकाऱ्याकडून स्वाक्षरी आणि शिक्का घ्यावा लागेल.

4. अपंग व्यक्तींसाठी UDID कार्ड हे swavlambancard.gov.in द्वारे काढून घ्यावे.

5. डिफेन्स फोर्स लॉगिनमधील पर्यायाचा वापर करून नवीन प्रमाणपत्र तयार करता येईल (MHADA Mumbai Lottery 2024) आणि सक्षम अधिकाऱ्याकडून स्वाक्षरी आणि शिक्का घ्यावा.

6. Ex-Serviceman Login मधील पर्यायाचा वापर करून नवीन प्रमाणपत्र तयार करता येईल आणि सक्षम अधिकाऱ्याकडून स्वाक्षरी आणि शिक्का मिळवा.

7. विधानसभा, लोकसभा, विधान परिषद सदस्य लॉगिनमधील पर्याय वापरून नवीन प्रमाणपत्र तयार करू शकता आणि संबंधित कार्यालयाची स्वाक्षरी आणि शिक्का आणा.

Leave a Comment