MHADA Lottery: घराच्या मालकीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. म्हाडाद्वारे पुण्यामधील काही घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. यामधे 1 आणि 2 बीएचके घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. या घरांसाठी कुठे अर्ज करता येईल? यासाठी कोणती कागदपत्रे गरजेची आहेत? यासोबतच कुठल्या भागात किती घरे आहेत? त्याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया.
पुणेकरांसाठी एक खूप चांगली बातमी समोर आली आहे. आता तुमचे पुण्यामधे घर घेण्याचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे. विविध उत्पन्न गटातील घरांसाठी म्हाडाच्या पुणे विभागाद्वारे मागच्या महिन्यामधे लॉटरी (MHADA Lottery) जाहीर करण्यात आली होती. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही संपली होती, मात्र या घरांसाठी काही लोकांना अर्ज करता आलेले नव्हते. त्यामुळे अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवून देण्याची मागणी नागरिकांद्वारे करण्यात आली आहे. या मागणीमुळे म्हाडाने या घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे.
म्हाडाने 4877 सदनिका पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी देण्याची घोषणा केली होती. या सोडतीसाठी नोंदणीची मुदत गुरुवारी 30 मे रोजी सायंकाळी संपली. शासकीय कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने विविध कागदपत्रे मिळण्यास उशीर होत आहे. त्यानंतर ही मुदतवाढ नागरिकांसाठी 6 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती.
म्हाडाने सध्याची मुदतवाढ ही अंतिम मुदतवाढ असल्याचे जाहीर केले आहे. 7 मार्चपासून म्हाडाच्या या सोडतीसाठी नोंदणी सुरू झाली. म्हाडा योजनेंतर्गत (MHADA Lottery) या सोडतीमधे 2416 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर, तर म्हाडाच्या 18 सदनिका वेगवेगळ्या योजनांतर्गत, म्हाडाच्या 59 सदनिका PMAY योजनेंतर्गत, 978 सदनिका या PMAY खाजगी भागीदारी योजनेंतर्गत आणि योजनेच्या 20 टक्के फ्लॅट्स हे पुणे शहरात आहेत. यामध्ये 745 सदनिकांचा समावेश केला गेला आहे. 561 फ्लॅट्स हे पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत.
म्हाडाचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाइटला भेट द्यावी:
http://www.mhada.gov.in
https://mhada.gov.in
8 एप्रिल ही यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित केली गेली होती. त्यानंतर आता ही अंतिम तारीख 30 मे पर्यंत वाढवण्यात आली असून पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. आता म्हाडाने (MHADA Lottery) तिसऱ्यांदा शेवटची तारीख वाढवली आहे. आता दिलेली ही मुदतवाढ शेवटची असून यानंतर कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. वेबसाईटवर सुधारित सोडतीचे वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेचा अधिकाधिक अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडाचे संचालक अशोक पाटील यांच्याद्वारे करण्यात आले आहे.
म्हाडाच्या घरासाठी आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड 2. पॅन कार्ड 3. राहण्याचा दाखला 4. उत्पन्नाचा दाखला 5. आयकर रिटर्न
येथे वाचा – या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 जुलैपर्यंत जमा होणार पैसे! बघा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी