मुंबई, ठाणे, पुण्यातील घरांसाठी म्हाडाची मोठी लॉटरी, 13 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध!

MHADA Lottery: मालमत्तेच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे. आता मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे मिळू शकतात. म्हाडाद्वारे आता तब्बल 13 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई-पुणे-ठाण्यातील घरांचा समावेश असेल. या शहरात ही घरे कुठे कुठे असतील याची थोडक्यात माहिती आता आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

म्हाडाचा मुंबईकरांसाठी काही मुख्य ठिकाणी प्राईम प्रकल्प सुरू आहे. म्हाडा (MHADA Lottery) मुंबईतील 3660 घरांची विक्री या प्रकल्पांतर्गत करणार आहे. ही घरे परवडणारी तर असतीलच, पण त्या सोबतच विविध उत्पन्न गटातील लोकांना ही घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबईत घर घेण्याचे कितीतरी लोकांचे जे स्वप्न आहे ते म्हाडाच्या या घरांच्या माध्यमातून आता पूर्ण होणार आहे.

तुम्ही पवई, मागाठाणे, पहारी गोरेगाव, कन्नमवार नगर येथे घरे (मुंबई 2 बीएचके फ्लॅट) खरेदी करू शकणार आहात. म्हाडाद्वारे मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबईमधील 4082 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. तब्बल 1 लाख 22 हजार अर्ज हे या घरांसाठी, म्हाडाकडे आले होते. त्यानंतर 3600 घरांसाठी लॉटरी निघण्याची शक्यता असल्याचं दिसून येत आहे.

मुंबई मंडळाने 2023 मध्ये जाहीर केलेल्या 4082 घरांच्या लॉटरीपैकी अजूनही 150 घरांची विक्री होणे बाकी आहे. म्हाडाच्या (MHADA Lottery) एका वरिष्ठ अधिकाऱ्याद्वारे दिल्या गेलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या अर्जदारांना मागील सोडतीमधील उर्वरित घरांचे वाटप करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. प्रतीक्षा यादीमध्ये ज्या अर्जदारांचा समावेश आहे अशा अर्जदारांना आणखी एक संधी देण्यात येईल ज्यामधे ते पैसे भरून घर खरेदी करू शकणार आहेत . या संधीनंतर सुद्धा जर घरे विकली गेली नाहीत, तर या घरांचा समावेश पुढील लॉटरीमधे केला जाणार आहे.

येथे वाचा – शेतकऱ्यांनो, मान्सून पुन्हा सक्रिय, आज आणि उद्या राज्यातील या 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस!

Leave a Comment