स्वस्त प्रॉपर्टीचा लिलाव; स्वस्तात घर, दुकान आणि प्लॉट घेण्याची मोठी संधी, येथे पहा सर्व माहिती..!

Mega E-Auction of Property : तुम्ही जर नवरात्रात स्वस्तात घर, प्लॉट आणि दुकान विकत घेण्याचा विचार करत असाल तर हे शक्य होणार आहे. आता एका बँकेमूळे तुम्हाला कमी किमतीत घर मिळण्यास मदत होणार आहे. आजच्या काळात प्रचंड वाढलेले संपत्तीचे दर सामान्यांचे घराचे स्वप्न करण्यात अडथळा निर्माण करतात. पण काही सरकारी गृह योजना तसेच बँकांमूळे स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ लागले आहे. अलीकडेच सरकारी बँक ‘बँक ऑफ बडोदा’चा (Bank of Baroda) मेगा ई-ऑक्शन आला आहे. यात तुम्हाला स्वस्तात घर, दुकान आणि प्लॉट घेण्याची संधी मिळत आहे.

मेगा ई-ऑक्शनमध्ये भाग कसा घ्यायचा?

या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची हीच वेळ आहे. या मेगा ई-ऑक्शनमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला तुम्हाला https://bankofbaroda.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

मेगा ई-ऑक्शन कधी?

या मेगा ई-ऑक्शनमूळे संपूर्ण भारतात घर, प्लॉट घेण्याची संधी मिळत आहे. हा मेगा ई-ऑक्शन 8 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबरला होत आहे. हा मेगा ई-ऑक्शन SARFAESI Act नुसार होणार आहे. तसेच हा मेगा ई-ऑक्शन पूर्णपणे पारदर्शक असणार असून यात कोणीही भाग घेऊ शकतो. यासाठी तुमच्याकडे kyc डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे.

बँक कोणत्या प्रॉपर्टीची करतात लिलाव?

अनेक लोक प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी बँकेकडून लोन घेतात, जर काही कारणामुळे लोन भरता येत नसेल तर बँकेकडून प्लॉट किंवा घर ताब्यात घेतले जाते. या प्रॉपर्टीचा लिलाव करून बँक आपले पैसे वसूल करते.

Leave a Comment