ग्राहकांनो, आता वीज बिलाची काळजी मिटली! महावितरणने ग्राहकांना दिल्या तीन सवलती..

Mahavitaran update: एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे जी राज्यातील नागरिकांसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी वीज जोडणीची समस्या आणि त्यांची बिले भरण्याच्या अलग अलग तारखांमुळे महावितरणने विविध शासकीय विभाग आणि खासगी कंपन्यांना एकाच ठिकाणाहून सर्व कनेक्शनची बिले ऑनलाइन भरण्याची सुविधा निर्माण करून दिली आहे.

बिल वेळेवर भरल्यास त्यांना एक टक्का सूट ग्राहकांना मिळेल. वीज बिलिंग आणि माहिती तंत्रज्ञान विभागांद्वारे, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तपणे ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्रामविकास पाणीपुरवठा, राज्यातील विविध शासकीय विभाग, जसे की पोलीस आणि मोठ्या खाजगी कंपन्यांना विजेच्या काही समस्या भेडसावत आहे. कारण राज्यातील विविध कार्यालयांची वीज जोडणी वेगवेगळी आहे आणि बिले भरण्यासाठी वेगवेगळी मुदत असल्याने, आर्थिक तरतूद असताना सुद्धा त्यांना वेळेवर वीज बिल भरता येत नाही. याउलट त्यांना दंड आणि व्याज भरावे लागते आणि काही वेळा तर हे बिल न भरले गेल्याने कनेक्शन सुद्धा तोडले जाते.

परिस्थिती सुधारण्यासाठी, नवीन महावितरण सुविधेमध्ये एखाद्या ग्राहकाने नोंदणी केल्यानंतर, संबंधित सरकारी एजन्सी किंवा कंपनीला या ऑनलाइन नोंदणीनंतर, वीज जोडणी बिले आणि त्यांची अंतिम मुदत, याविषयीची सगळी माहिती ही त्यांच्या मुख्यालयातच मिळेल.

यासोबतच, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेवर भरलेल्या प्रत्येक बिलावर एक टक्का सवलत दिली जाईल. यासोबतच डायरेक्ट कॅश ऐवजी इलेक्ट्रॉनिक बिले भरल्यामुळे प्रत्येक बिलावर 10 रुपयांची सूट दिली जाईल आणि डिजिटल पेमेंटसाठी जास्तीत जास्त 500 रुपयांची सूट दिली जाईल. या सुविधेसाठी तुम्ही महावितरणच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करू शकता. अधिक माहितीसाठी जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याची शिफारस केली जात आहे.

येथे वाचा – काय सांगता? शेतकऱ्यांनो फक्त एक रुपयात मिळणार पीक विमा; ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख!

Leave a Comment