MHADA Lottery 2024: अभ्यास, शिक्षण आणि नोकरी आणि त्या नंतर स्वतःचे हक्काचे घर… अनेकजण हे स्वप्न बघतात. काही मंडळींची धडपड हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप आधीच सुरू होते आणि हे सगळे प्रयत्न एका टप्प्यावर पोहोचून आकार प्रत्यक्षात साकार होतात. असे असले तरीही काहींना मात्र स्वतःचे हक्काचे घर मिळण्यासाठी अनेक अडचणी येत असतात. यामधे सर्वात मोठी समस्या म्हणजे पैशाची समस्या असते. अनेकवेळा आपल्याला घर आवडलेल असतं पण आपल्या खिशाला परवडत नसल्याने आपण त्या घराचा विचार सोडून देतो. मात्र, आता काही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. कारण येणाऱ्या म्हाडाच्या लॉटरी (MHADA Lottery 2024) सोडतीत अनेक जण आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी हातभार लावताना दिसणार आहेत.
विधानसभेच्या निवडणुका आणि आचारसंहिता लागू होण्याच्या आधी म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून त्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या लॉटरी साठी म्हाडा ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारून विक्री करण्याचा प्रयत्न करत असून पुढील महिन्यात ही लॉटरी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या तारखेला लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार.. जाणून घ्या सविस्तर..
मुंबईतील उर्वरित लॉटरी घरांव्यतिरिक्त गोरेगाव, मालाड, पवई कोपरी, दिंडोशी, आणि विक्रोळी कन्नमवार नगर येथील घरेही या म्हाडाच्या सोडतीत उपलब्ध असतील. म्हाडाद्वारे 2020 ते 2022 या दरम्यान एकही सोडत काढली गेली नव्हती. मात्र 2023 मध्ये म्हाडाने (MHADA Lottery 2024) 4082 घरांची सोडत काढली आहे. मात्र, या वर्षी जुलै अखेरपर्यंत सोडत जाहीर होईल, असे स्पष्ट संकेत बघायला मिळत आहेत.
स्थानासह मालमत्तेच्या किंमती पहा
पुढील किंमती ह्या अनुक्रमे स्थान, उत्पन्न गट, घरांची क्षेत्रफळ आणि घरांच्या किंमती या प्रकारे दिल्या आहेत.
खडकपाडा- लहान गट 44.61 चौरस फूट- 64 लाख 72 हजार 584 रुपये
खडकपाडा- लहान गट- 59.91 चौरस फूट- रु 86 लाख 11 हजार 923
कन्नमवारनगर विक्रोळी- मध्यम गट- 650 चौ.फू.-70 ते 72 लाख
कन्नमवारनगर विक्रोळी- लहान गट- 473 चौ.फू.- 40 लाख रुपये
कन्नमवारनगर विक्रोळी- लहान गट 585 चौ.फू.- 50 लाख रुपये
गोरेगाव पहाडी- मध्यम गट- 794.31 चौरस फूट 1 कोटी 7 लाख 5 हजार 5 रु
गोरेगाव पहाडी- उच्च गट 959 चौरस फूट- रु 1 कोटी 25 लाख 91 हजार
गोरेगाव PMY- 322 चौरस फूट- 33 लाख 2000 रु
पवई कोपरी- मध्यम गट- 700 ते 800 चौ.फू.- 1 कोटी 25 लाख रुपये
पवई कोपरी- उच्च गट- 980 चौरस फूट- रु. 1 कोटी 60 लाख
मालाड शिवधाम- लहान गट- 44.20 चौरस मीटर- रु 54 लाख 91 हजार | (MHADA Lottery 2024)
मालाड शिवधाम- लहान गट- 58.93 चौरस मीटर- 73 लाख 22 हजार रुपये
येथे वाचा – दुचाकीस्वारांनो सावधान! गाडी घेऊन बाहेर पडाल तर भरावा लागेल 25 हजारांचा दंड.. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..