खुशखबर! लाडक्या बहिणींना दिवाळीचे गिफ्ट; या तारखेला मिळणार 3000 रुपये, पहा नवीन तारीख..!

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणून राज्यातील लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट दिले आहे. शिंदे सरकारने सुरू केलेल्या या योजनेची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. या योजनेतून महिलांना प्रतेक महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यात दिले जात आहे. वर्षाला 18,000 होतात. सप्टेंबर महिन्यात या योजनेचा तिसरा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच देणार असल्याची घोषणा अजित पवारांकडून करण्यात आली आहे. (Ladki Bahin Scheme).

बीड येथे माजलगाव मधील सभेत अजित पवारांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी राज्यातील बहि‍णींना भाऊबीज म्हणून 3000 रुपये देणार आहे, असा अजित दादांचा वादा आहे, असं अजित पवार बोलले. हे लक्षात घेता दिवाळीपू्र्वी महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) पुढील पाच वर्षे सुरू राहील. भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे 3000 रुपये 10 ऑक्टोबरला लाभार्थी असलेल्या महिलांच्या खात्यात जमा केले जातील, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आता लवकरच महिलांना भाऊबीजचे गिफ्ट मिळणार आहे.

खुशखबर! या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार पीक विमा; जाणून घ्या माहिती..!

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता होतोय जमा (Ladki Bahin Yojana 3rd Installment)

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. अशा काही महिला आहेत की ज्यांना अजून एक रुपया देखील मिळाला नाही अशा महिलांना 4500 रुपये मिळणार आहेत. आणि ज्या ज्या महिलांनाच्या खात्यात आतापर्यंत 3000 रुपये जमा झाले आहेत अशा महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत.

खुशखबर! शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात; येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment