Soybean Rates : सोयाबीन हे पीक देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खूपच महत्त्वाचे पीक (Soybean Crop) म्हणून ओळखले जाते. सध्या शेतकर्यांनी सोयाबीन पिकाची लागवड सुरू केली आहे. पण अजून सुद्धा बाजार समितीत गेल्या खरिपातील सोयाबीनची आवक होताना दिसत आहे. काल लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी दर हा 4486 रुपये मिळाला आहे. सध्या जरी सोयाबीनला मनासारखा भाव मिळत नसला तरी येत्या काळात म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत सोयाबीनला कसा भाव मिळेल हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मागील 3 वर्षांच्या किमती काय?
मागील वर्षी लातूर बाजारात सोयाबीनचे दर जरा चांगले होते. पण यंदा सोयाबीन दरात घसरण झालेली आहे. गेल्या तीन वर्षात ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत सोयाबीनचे दर चांगले होते. मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर 2023 या काळात सोयाबीनला 4 हजार 876 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. आणि ऑगस्ट-सप्टेंबर 2022 या काळात 5 हजार 384 प्रतिक्विंटल तर ऑगस्ट-सप्टेंबर 2021 या काळात 07 हजार 783 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता.
येत्या 4 महिन्यात कशा असणार किंमती?
यावर्षीसाठी म्हणजेच 2023-24 या हंगामासाठी किमान आधारभूत किंमत 4 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल एवढी आहे. पण सध्या लातूर बाजारामध्ये फक्त 4 हजार 400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळू लागला आहे. गेल्या चार वर्षात सोयाबीनच्या दरात सतत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण ऑगस्ट-सप्टेंबर 2024 या कालावधीत 4 हजार 400 रुपये ते 5 हजार 200 रुपये प्रति क्विंटल असा संभाव्य दर मिळण्याची शक्यता आहे.
येथे वाचा – शेतकऱ्यांनो, आता तुमच्या मुलींना मिळणार मोफत शिक्षण, सरकारचा मोठा निर्णय..