शेतकऱ्यांनो सावधान! मुसळधार पाऊस घेऊन येणार मोठे संकट, IMD ने दिला हाय अलर्ट..

Weather Update: महाराष्ट्रातील काही भागांमधे पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी हवामान खात्याने (IMD) राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा अतिवृष्टी (Weather Update) होणार असल्याचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, येत्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

तर दुसरीकडे, कोकणातही मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान (Weather Update) खात्याने वर्तवली आहे. कोकणात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. यासोबतच काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याद्वारे वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे आज विदर्भातही चांगलाच पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार (Weather Update) पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पाऊस तर पडणारच आहे, पण त्या सोबतच या काळात जोरदार वादळी वाऱ्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याद्वारे दिला गेला आहे. वाऱ्याचा वेग 50-60 किमी/तास असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या जोरदार वाऱ्याच्या रूपाने राज्यात मोठं संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडीशी उघडीप दिली होती, मात्र आता हवामान खात्याने (Weather Update) पुन्हा एकवेळेस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

येथे वाचा – शेतकऱ्यांनो, आता तुमच्या मुलींना मिळणार मोफत शिक्षण, सरकारचा मोठा निर्णय..

Leave a Comment