शेतकऱ्यांनो सावधान! 25 ते 27 जून दरम्यान महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस! जिल्ह्यांची यादी पहा!

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा मोसमी पावसाला सुरुवात झाली  असल्याचं दिसून येत आहे. प्रत्यक्षात मान्सूनचे आगमन झाल्यावर सुरुवातीच्या टप्प्यामधे राज्यात चांगलाच पाऊस झाला होता. मात्र 12 जूननंतर मान्सून विदर्भात दाखल झाल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला.

12 ते 22 जून या दहा दिवसांच्या कालावधी मधे राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने उघडीप दिली असल्याचं पाहायला मिळालं तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला होता. पण आता परिस्थिती याहून उलट आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. 23 जून रोजी उत्तर महाराष्ट्रामधील (Maharashtra Rain Alert) नाशिक जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झाला.

अशीच स्थिती मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्हा आणि पुण्यातील घाटमाथा येथे पाहायला मिळाली. याशिवाय कोकणातही जोरदार पाऊस झाला. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने 27 जूनपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

24-27 जून दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता असून भारतीय हवामान खात्याने संबंधित जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याचा (Maharashtra Rain Alert) हा अंदाज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत.

भारतीय हवामान खात्याने काय म्हटले?

24 जून : कोकणच्या दक्षिण भागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूरमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, संपूर्ण खान्देश, मध्य महाराष्ट्र नाशिक, संपूर्ण विदर्भ, पुणे, अहमदनगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी (Maharashtra Rain Alert) करण्यात आला आहे.

25 जून : रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी केला गेला असून त्यासोबतच मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, नंदुरबार धुळे, आणि विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

26 जून : राज्यातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्यांसाठी 26 जून रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला गेला असून, मुंबई, ठाणे, पालघर, विदर्भ आणि कोल्हापूर मधील सर्व 11 जिल्ह्यांनाही (Maharashtra Rain Alert) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

27 जून : राज्यातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी 27 जून रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, त्यासोबतच मुंबई, ठाणे आणि विदर्भातील सगळ्याच 11 जिल्ह्यांसाठीही देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येथे वाचा – सरसकट कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांना वीज सुद्धा मोफत मिळणार, जिल्हा बँक अध्यक्षांच्या सूचना

Leave a Comment