पुढील चार दिवस मुंबईसह या भागात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा यलो अलर्ट!

Mumbai Rain Update: मान्सून राज्यभर पसरला आहे (Mumbai Rain Update), त्यासोबतच अनेक भागात पावसाची संतत धार देखील बघायला मिळत आहेत. मात्र, अजूनही काही भागात पावसाने दडी मारली असल्याचे चित्र दिसून येत आहे. पण आता मात्र, पावसाने मुंबईकरांना दिलासा दिला असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. कालपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून मुंबईतील काही भागात पाऊस सुरू आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यासह कोकण किनारपट्टीलगतच्या भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सिंधुदुर्ग ते ठाणे किनारपट्टीवर पुढील चार दिवस संततधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. यासाठी हवामान खात्याद्वारे यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, तसेच मुंबईसह किनारपट्टी भागात चार दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

आज पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तवण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून मान्सूनची (Mumbai Rain Update) प्रगती ठप्प झाली होती, मात्र आता मान्सूनच्या वाऱ्यांसाठी पोषक वातावरण असल्याने राज्यभरात लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे. या दरम्यान, अलिबागमध्ये 38 मिमी, डहाणूत 58 मिमी, हर्णे मधे 11 मिमी, सांताक्रूझमध्ये 6 मिमी आणि रत्नागिरीमध्ये 14 मिमी पाऊस झाला आहे.

1 ते 18 जून दरम्यान राज्यातील प्रमुख शहरांमध्ये झालेला सरासरी पाऊस (Mumbai Rain Update) खालील प्रमाणे आहे:

जिल्ह्यात सरासरी पाऊस
मुंबई शहर 146.3 ते 268.6
रत्नागिरी 280.2 ते 398.9
पुणे 122.6 ते 92.9
सिंधुदुर्ग 386.1 ते 461.1
सांगली 123 ते 77.2
कोल्हापूर 100 ते 171.8
नागपूर 40 ते 68.7
सातारा 113.2 ते 100.7

गेल्या आठवड्यापासून मान्सून थांबला होता. त्यामुळे राज्यभरात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. मात्र आता अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य मान्सूनचा (Mumbai Rain Update) जोर लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसून आले आहे. पुढील चार दिवस पश्चिम घाट प्रदेश आणि किनारपट्टीवर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येथे वाचा – तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? रेशन कार्ड धारकांना दरमहा मिळणार 12 हजार रुपये!

Leave a Comment