खुशखबर! शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात; पहा सोयाबीन कापूस अनुदान तुम्हाला आले का?

Government Subsidy For Farmers : सोयाबीन आणि कापूस अनुदानाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला असून अनुदानासाठी पात्र असलेल्या 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदान (Government Subsidy) जमा करण्यात आले आहे.

या अनुदान वितरणाचा ई शुभारंभ आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला आहे. दरम्यान राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे तसेच राज्यातील इतर आणि अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारकडून 2023 च्या खरिपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेणार्‍या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 5000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला आहे. पण गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी या अनुदानाची वाट पाहत बसले होते. पण अखेर आता अनुदानाच्या पहिल्या टप्प्याच्या वितरणाची सुरुवात झाली आहे.

पहिल्या टप्पातील पात्र शेतकरी किती?

राज्यातील तब्बल 96 लाख एवढे शेतकरी सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पात्र ठरले आहे. या शेतकर्‍यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार 398 कोटी 93 लाख एवढे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

महिलांनो! मोफत गॅस सिलिंडर घ्यायचाय का? फक्त इथे करा एक अर्ज..!

अनुदान कधी पर्यंत जमा होणार? (Subsidy)

या पहिल्या टप्प्यातील अनुदान हे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जसे कागदपत्रे जमा होतील आणि आधारचं ई केवायसी केल्या जाईल तसतसे अनुदान जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्याकडून देण्यात आली आहे. अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने (DBT) अनुदान जमा होणार आहे.

Leave a Comment