Crop Insurance: कृषी विभागाने, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि पुरामुळे होणारे त्यांचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत आहे. पुनर्रचित हवामानावर आधारित असलेली फळ पीक विमा योजना लागू करून, विभाग मृग बहारामधे पेरू तसेच आंबिया या बहारात आंबा, द्राक्षे, केळी आणि काजू या फळपिकांसाठी विमा संरक्षण प्रदान केले जाणार आहे.
या योजनेचे (Crop Insurance) फायदे काय:
विमा रक्कम किती:
पेरू: ₹70,000 प्रति हेक्टर
द्राक्षे: ₹3,80,000 प्रति हेक्टर
केळी: ₹1,70,000 प्रति हेक्टर
आंबा: ₹1,70,000 प्रति हेक्टर
काजू: ₹1,20,000 प्रति हेक्टर
शेतकऱ्यांनो खूशखबर, अबकी बार सोयाबीन 10,000 पार.. बघा सोयाबीनचा आजचा भाव..
विम्याचा हप्ता किती:
पेरू: ₹3,500 प्रति हेक्टर
द्राक्षे: ₹19,000 प्रति हेक्टर
केळी: ₹8,500 प्रति हेक्टर
आंबा: ₹8,500 प्रति हेक्टर
काजू: ₹7,800 प्रति हेक्टर
अंतिम मुदतेची मर्यादा:
पेरू: 25 जून 2024
द्राक्ष: 15 ऑक्टोबर 2024
केळी: 31 ऑक्टोबर 2024
आंबा: 31 डिसेंबर 2024
काजू: 30 नोव्हेंबर 2024
मोठी बातमी! अखेर या लोकांना मिळालं म्हाडाच घर.. या तारखेला मिळणार घराचा ताबा!
अतिरिक्त फायदे काय आहेत:
अंबिया हंगामात गारपीट संरक्षणासाठी अतिरिक्त विमा प्रीमियम (Crop Insurance) भरण्याची सुविधा.
ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार दोघांसाठी खुली आहे.
विमा कंपनीच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येतील.
कोणाला सहभागी होता येऊ शकते?
असे सर्व शेतकरी जे विम्याचा (Crop Insurance) हप्ता भरण्यास तयार आहेत.
असे शेतकरी जे सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करतील.
जसे की आधार कार्ड, सात बारा उतारा, बँक पासबुक इ.
अधिक माहिती मिळवण्यासाठी:
जवळील कृषी सहाय्यक, कृषी व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी, किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांना तुम्ही संपर्क करू शकता.
त्यासोबतच राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा किंवा मग जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखा यांच्याशी सुद्धा संपर्क करू शकता.
कृषी विभागाद्वारे करण्यात आले आवाहन:
या कार्यक्रमात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागाचे कृषी उपसंचालक बसवराज बिराजदार यांनी केले आहे. “या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी विम्याद्वारे (Crop Insurance) त्यांचे झालेले पीक नुकसान भरून काढू शकतात आणि आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना त्यांचे आर्थिक नुकसान कमी करता येऊ शकते,” असेही ते पुढे म्हणाले आहेत.
येथे वाचा – खुशखबर! ‘या’ कुटुंबांना मिळणार मोफत 3 गॅस सिलिंडर, पहा या यादीत तुम्ही आहात का?