केंद्र सरकार नेहमीच लोक कल्याणाच्या योजना आणत असते. सरकारच्या या योजनांचा गोरगरीब नागरिकांना मोठा फायदा होतो. सरकारी योजनांमुळे दवाखान्यात मोफत उपचार मिळतात. ही बाब सामान्य नागरिकांसाठी खूपच फायद्याची आहे. कारण गोरगरीब आणि मध्यमवर्गातील नागरिकांना उपचारासाठी येणार्या खर्चाची चिंता नेहमी सतावत असते. दवाखान्यात उपचारासाठी लाखो रुपये खर्च येतो. त्यामुळे अनेक गोरगरीब नागरिक योग्य उपचार घेऊ शकत नाही. म्हणून अशा नागरिकांना मोफत उपचार (Free Treatment) मिळावा यासाठी सरकार विविध योजना आणते. आता काही नागरिकांना आयुष्यमान योजने अंतर्गत मोफत उपचार मिळणार आहे. हा मोफत उपचार तुम्हाला पण मिळणार का? चला जाणून घेऊ कामाची माहिती.
‘या’ लोकांना मिळणार मोफत उपचार
आठराव्या लोकसभेला संबोधित करत असताना आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोठी खुशखबर दिली आहे. आता वयस्कर लोकांना मोफत उपचार मिळणार आहे. ज्यांचे वय 70 वर्षांच्या पुढे आहे अशा सर्व व्यक्तींना आयुष्यमान योजनेअंतर्गत मोफत उपचार (Free Treatment) मिळणार आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाने यासंदर्भात घोषणापत्रात उल्लेख केला होता.
आता नव्या सरकारमध्ये 70 वर्षांच्या पुढील वयाच्या सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana) योजनेचा फायदा दिला जाणार आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करत असून शेतकऱ्यांना 20 हजार कोटी एवढे रुपये ट्रान्सफर करण्यात आले असल्याची माहिती द्रौपदी मुर्मू यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार केला जाणार असून त्यात वृद्ध व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे. अशा वृद्ध व्यक्तींना मोफत आणि चांगली आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत देण्यात येतो.
येथे वाचा – आनंदाची बातमी! आता पीक कर्ज घेण्यासाठी ‘ही’ अट नसणार, आता तुम्हालाही मिळणार पीक कर्ज..!