Free Solar Chulha: सरकार द्वारे महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी विविध योजना या राबवण्यात येतच असतात. अशीच एक महिलांसाठीची योजना म्हणून उज्ज्वला योजना ओळखली जाते. या योजनेच्या अंतर्गत महिलांना सरकार मार्फत मोफत सिलिंडर देण्यात येतात.
याशिवाय सिलिंडर भरण्यासाठी दर महिन्याला सबसिडी सुद्धा देण्यात येते. याच संदर्भात, राज्य सरकारद्वारे आता सौर चुल्हा (Free Solar Chulha) योजनेला सुद्धा प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
महिलांना आता याच योजनेंतर्गत सौरऊर्जेवर चालणारे गॅस स्टोव्ह सुद्धा दिले जाणार आहेत. या सोलर गॅस स्टोव्ह मुळे महिलांची गॅस सिलिंडर पुन्हा पुन्हा भरण्याच्या त्रासातून मुक्तता होईल आणि त्यांना अन्न शिजविणे सहज शक्य होईल. विशेष गोष्ट म्हणजे अशी की हा सोलर स्टोव्ह खरेदी केल्यावर महिलांना सारखा सारखा सिलिंडर भरण्याच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे.
अखेर या जिल्ह्यात 113 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वाटप सुरू झाले, या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली रक्कम..
मीडिया रिपोर्ट्स च्या अनुसार, सौर चुल्हा योजनेच्या अंतर्गत महिलांना गॅस सिलिंडरच्या जागी सौर पॅनेलवर चालणारे स्टोव्ह दिले जातील. बाजारात या स्टोव्हची (Free Solar Chulha) किंमत सुमारे 15,000 ते 20,000 रुपये असल्याचे दिसून येते, आणि आता सरकारद्वारे हेच स्टोव्ह महिलांमध्ये वाटप केले जाणार आहेत. हे स्टोव्ह महिलांना नाममात्र दरात दिले जाणार आहेत.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन द्वारे महिलांसाठी खास स्वयंपाकाचा स्टोव्ह तयार करण्यात आला आहे जो गॅसऐवजी सौरऊर्जेवर चालतो. तसेच या स्टोव्ह ला रिचार्ज सुद्धा करता येऊ शकते. या स्टोव्हमध्ये स्वयंपाक करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जातो. हा स्टोव्ह महिलांना अनुदानासह स्वस्त दरात दिला जातो. कंपनीने तुम्हाला निवडण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारचे स्टोव्ह तयार केले आहेत, त्यातून एकाची निवड तुम्ही करू शकता.
सौर स्टोव्ह कसा काम करतो?
घराच्या छतावर सौर चुल्हा योजनेंतर्गत सोलर पॅनल बसवून ते वायरच्या माध्यमातून या बॅटरीला जोडले जाते. सूर्यप्रकाशाने ही बॅटरी चार्ज होते आणि याच ऊर्जेचा वापर करून हा सौर स्टोव्ह चालतो. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आकाश ढगाळ असो किंवा पाऊस असो, हा सोलर स्टोव्ह 24 तास काम करतो.
खुशखबर! या शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,500 कोटी रुपयांची रक्कम जमा, पात्र शेतकऱ्यांची यादी तपासा!
कोणत्या महिलांना सोलर स्टोव्ह (Free Solar Chulha ) मिळेल?
गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत हा सोलर स्टोव्ह मिळू शकतो. तथापि, अट अशी आहे की लाभार्थीकडे आधीच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस सिलिंडर घेतलेला नसावा, म्हणजेच अद्याप त्या लाभार्थ्याला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळालेला नसावा. त्यामुळे निश्चितच ज्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल, त्यांना या स्टोव्ह ची किंमत ही मोजावी लागणार आहे.
सौर चुल्हा (Free Solar Chulha ) योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
जर तुम्हाला सुद्धा या सौर चुल्हा योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी अर्ज करावा लागणार आहे. तुम्हाला ज्या कागदपत्रांची आवश्यकता असेल त्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, फोटो, बँक पासबुक इत्यादींचा समावेश केला गेला आहे.