मोठी बातमी! अखेर या लोकांना मिळालं म्हाडाच घर.. या तारखेला मिळणार घराचा ताबा!

Mumbai MHADA Lottery: मुंबईत मालमत्तांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मुंबईकरांचे घराचे हे स्वप्न आता म्हाडा पूर्ण करणार आहे. या वर्षी म्हाडा कोणत्या महिन्यात घरांसाठी लॉटरी काढणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचणं आवश्यक असणार आहे.

मुंबईत किमान एक तरी स्वतःच्या हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मुंबईकरांची असलेली ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे. मुंबईतील 1,900 घरांची जाहिरात जुलैमध्ये प्रसिद्ध होणार आहे आणि म्हाडाने (Mumbai MHADA Lottery) या घरांची सोडत काढण्याची तयारी देखील केली आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी ही चांगली बातमी आहे.

मुंबईत घर घेणे मध्यमवर्गीयांना परवडणारे राहिलेले नाही. 1 BHK घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मुंबईमध्ये एकदम मोक्याच्या लोकेशन वर घर घेणे हे काही प्रत्येकाला परवडेलच असे नाही. याच कारणाने सर्वसामान्य नागरिक म्हाडाच्या लॉटरीची प्रतीक्षा करत असतात.

अरे देवा! या लोकांचं मोफत रेशन बंद, आता फक्त याच लोकांना मोफत रेशन मिळणार..

मुंबईसह राज्यातील एक ना अनेक शहरांमध्ये म्हाडाद्वारे घरे उपलब्ध करून देण्यात येतात. परवडणाऱ्या आणि मोक्याच्या ठिकाणी असलेली घरे सर्वसामान्यांना परवडणारी आहेत. ऑगस्ट 2023 मध्ये मुंबई म्हाडा बोर्डाने मुंबईतील सुमारे चार हजार घरांसाठी सोडत काढली. आणि या लॉटरी (Mumbai MHADA Lottery) साठी सुमारे पाच लाख अर्ज आले होते.

म्हाडाने गोरेगाव, विक्रोळी येथील घरांसाठी ऑगस्ट 2023 मध्ये लॉटरी काढली होती. तेव्हापासून यंदाची म्हाडाची लॉटरी कधी सुरू होईल याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. मात्र आता ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. म्हाडाच्या मुंबई विभागाने सुमारे एक हजार नऊशे घरांच्या सोडतीची तयारी सुरू केली आहे.

अर्रर्र.. ‘या’ महिलांना मिळणार नाही 1500 रुपये महिना.. पहा योजनेसाठी ‘या’ महिला अपात्र..

मुंबई शहर आणि उपनगरातील ही घरे सर्व उत्पन्न गटातील लोकांसाठी योग्य असतील. या घरांची लॉटरीची घोषणा जुलैमध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये लॉटरी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही घरे कुठे असणार आहेत ते अजून तरी समजू शकलेले नाही.

हाय-फाय घर समाविष्ट

गोरेगाव प्रेमनगरमध्ये 322 हायफाय घरे बांधण्यात आली आहेत. ही घरे 800 ते 1000 चौरस मीटरच्या अपार्टमेंटमध्ये बांधलेली आहेत. ऑगस्टमध्ये होणाऱ्या सोडतीत (Mumbai MHADA Lottery) म्हाडा याही घरांचा समावेश करणार आहे. मात्र, अजून तरी या घरांच्या किमती जाहीर झाल्या नसल्याच समजून येत आहे.

Leave a Comment