या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर बियाणे, पहा बातमी..

Seed Subsidy Scheme : यंदा जिल्हा परिषदेच्या वतीने सेस योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर भुईमूग, मूग, तूर आणि उडीद या पिकांचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. 19 टन बियाणे याअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले असून या बियाण्यांचे वाटप हे शेतकऱ्यांना जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती कार्यालयामधून सुरू करण्यात आले आहे. पाच टन बियाणांचे वाटप हे पहिल्याच दिवशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यामधील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात, दर्जेदार डाळी, कडधान्य व भुईमूग बियाणे कमी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने ही योजना सुरू केली आहे. 15 तालुक्यांसाठी हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भुईमुगाच्या बियांची (Seed Subsidy Scheme) एक पिशवी 20 किलोची असून 11,240 किलो बियाणे उपलब्ध करून देण्यात आले असल्याचं समजून येत आहे.

मूग, तूर आणि उडीद बियांच्या प्रत्येकी दोन किलोच्या पिशवीसाठी अनुक्रमे 1,904, 2,666 आणि 3,156 किलो बियाणे उपलब्ध करून दिले गेले आहे. विहित नमुन्यात बियाणे मागणीसाठी प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. सातबारा उतारा आणि आठ अ चे योग्य उत्तरे त्यांना अर्जासोबत जोडावे लागतील.

जास्तीत जास्त एक हेक्टरसाठी एका लाभार्थी शेतकऱ्याला आवश्यक बियाणे (Seed Subsidy Scheme) उपलब्ध करून दिले जाईल. चालू आर्थिक वर्षात लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा लाभ घेता येणार नाही. बियाणे वाटपाची तालुकानिहाय उद्दिष्टाची आकडेवारी जिल्हा परिषदेने निश्चित केली गेली आहे.

50 टक्के सबसिडी अशी दिली जाईल

या योजनेंतर्गत तूर, उडीद, मूग, भुईमूग आणि हरभरा या बियाण्यांवर 50% अनुदान उपलब्ध होईल. उर्वरित 50 टक्के रक्कम गट स्तरावर बियाणे वितरणापूर्वी शेतकऱ्यांकडून वसूल केले जातील, त्यांनतर डीडी धनादेश जारी करून पुरवठादार संस्थेच्या नावे या कार्यालयात पाठवावेत. अनुदानाचे अर्ज संपूर्ण कागदपत्रांसह दफ्तरी सादर करावेत.

वाटप नोंदवही अद्ययावत ठेवावी. बियाणे (Seed Subsidy Scheme) वाटपासोबतच पेरणीनंतर 100% क्षेत्र तपासणी कृषी अधिकारी (कृषी) यांनी करून त्याचा अहवाल कार्यालयास सादर करावा. उपयोगिता प्रमाणपत्र देखील सादर केले पाहिजे.

अशी आहे बियाण्यांची (Seed Subsidy Scheme) किंमत

या योजनेंतर्गत हे बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फत पुरविले जाते. यामध्ये 420 रुपये दराने 2 किलोची तूर बियाणे बॅग समाविष्ट आहे, तर शेतकऱ्यांना ती फक्त 210 रुपये दराने मिळणार आहे. 450 रुपये ही मूग बियाण्याच्या 2 किलोच्या पिशवीची किंमत असून त्यासाठी शेतकऱ्यांना 225 रुपये मोजावे लागणार आहेत. उडीद बियाण्याच्या 2 किलोच्या पिशवीची किंमत 380 रुपये असून शेतकऱ्यांना ती 190 रुपयांना मिळणार आहे. भुईमूग च्या 20 किलोच्या (Seed Subsidy Scheme) पिशवीची किंमत 3,200 रुपये आहे. शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान म्हणून ती 1,600 रुपयाला मिळेल.

येथे वाचा – बांधकामाआधीच म्हाडा देणार घराचा ताबा! म्हाडाची स्वस्त घरांची लॉटरी जाहीर!

Leave a Comment