खुशखबर! ‘या’ शेतकऱ्यांना लागली मोठी लॉटरी; पहा सरकारने काय घेतला निर्णय..!

Maharashtra Budget 2024 : अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी योजना जाहीर केली. त्यामुळे शेतात सतत वीज जाण्याची काळजी असणार नाही. राज्याच्या अर्थसंकल्पामधे यासाठी कितीतरी कोटी रुपयांची तरतूद केली गेली असल्याचं दिसून येत आहे.

आज आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याद्वारे अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना जाहीर केली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतामधे अखंड वीजपुरवठा होणार असून त्यांच्या शेतात आता वीज नसण्याचा त्रास होणार नाही. अखंडित वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी रात्रंदिवस जागे राहण्याची गरज भासणार नाही. अजितदादांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना या योजनेवर विशेष लक्ष दिले आहे. तसेच शेतकर्‍यांच्या कृषीपंपाचे वीज बिल माफ करण्यात आले आहे.

15000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा

अजित दादांनी घोषणा केली की 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प हा शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज पुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा (Solar Energy) आणि कृषी वाहिन्यांचे विलगिकरण करण्यासाठी हाती घेण्यात आला असून शेतकऱ्यांना मोफत ऊर्जा मिळावी यासाठी मागेल त्यास सोलर पॉवर पंप (Solar Pump) योजनेंतर्गत 8,50,000 शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मोफत सौरऊर्जेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे पंप मिळणार आहेत.

पीक कर्ज काढलेल्या शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, येथे क्लिक करून पहा बातमी..

सांगली आणि म्हैसाळ जिल्ह्यात वीजबिल कमी करण्यासाठी आणि सिंचनासाठी शाश्वत ऊर्जा पुरवठा करण्यासाठी वतदर्शी सौरऊर्जा प्रकल्प (Maharashtra Budget 2024) राबविण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. 1,594 कोटी रुपये ही या प्रकल्पाची अंदाजे किंमत असून सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यामधील सुमारे 75,000 शेतकरी कुटुंबांना या गोष्टीचा लाभ होणार आहे.

स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सर्व राज्य सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविल्या जातील, ज्यात जनाई शिरसाई पुरंदर उपसा सिंचनाच्या योजनांचा देखील समावेश केला गेला आहे, ज्याचा खर्च अंदाजे 4,200 कोटी रुपये आहे.

अरे वा! आता ‘या’ नागरिकांना मोफत उपचार; येथे क्लिक करून पहा बातमी..

नदीजोड प्रकल्पावर भर देण्याची गरज

विदर्भातील वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यातील 3,71, 277 एकर जमिनीला सिंचनाचा लाभ देण्यासाठी गोसीखुर्द प्रकल्पातील 62.57 टीएमसी पाणी वैनगंगा नळगागा नदी जोड प्रकल्पाद्वारे वळविण्याचे नियोजन आहे.

3,200 कोटी रुपये खर्चाची महाराष्ट्राची प्रमुख प्रतिसादात्मक विकास योजना, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये उपजीविकेसाठी वित्तपुरवठा (Maharashtra Budget 2024) करण्यासाठी आणि दुष्काळी भागातील अतिरिक्त पाण्याचे वळण रोखण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येत आहे.

या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 जुलैपर्यंत जमा होणार पैसे! येथे क्लिक करून पहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी

जलयुक्त शिवारावर किती खर्च आहे?

जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत मार्च 2024 च्या अखेरपर्यंत एकूण 50 हजार 651 कामे पूर्ण करण्यात आली असून यावर्षी 650 कोटी रुपयांचा निधी (Maharashtra Budget 2024) देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार गाळमुक्त योजना धरणांतर्गत सध्या राज्यातील एकूण 38 जलाशयांमधून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत एकूण 83 लाख 39 हजार 818 घनमीटर गाळ काढण्यात आला असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment