Kapus khat niyojan: कापूस पिकासाठी खताचा पहिला डोस केव्हा आणि कोणता द्यावा, याबाबत ची अधिक माहिती आज आपण या लेखातून माहीत करून घेणार आहोत. माहिती अतिशय महत्वाची आहे, म्हणून ती काळजीपूर्वक वाचा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा.
कपाशीला पहिला डोस कधी द्यायचा? (लागवडीपूर्वी/लागवडीच्या वेळी/लागवडीनंतर)
कापूस लागवडीपूर्वी काही शेतकरी खत घालतात, तर काही शेतकरी लागवडीच्या वेळीच खत घालतात. अनेक शेतकरी पहिल्या किंवा दुसऱ्या पाळीसोबत लागवड केल्यानंतर कापसाला खत देतात. मात्र कापूस लागवडीनंतर जर घालत असाल तर ते लवकरात लवकर टाकाव. लागवडीनंतर खत उशिरा दिल्यास, पिकाला लगेच खत न दिल्याने उत्पादनाचे नुकसान होऊ शकते. कारण खत पिकास लागू होण्यासाठी थोडा वेळ लागतो, आणि जर आपण खत उशिरा घातले, तर अनेक दिवसांनी ते खत (Kapus khat niyojan) पिकाला मिळते, म्हणून खत शक्य तितक्या लवकर घालावे.
शेतकऱ्यांनो, या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झाली.. एका क्लिकवर पहा जिल्ह्यांची यादी..
कापसासाठी खताचा पहिला डोस कोणता आणि प्रति हेक्टर किती किलोग्रॅम…?
येथे तुम्ही खालीलपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता आणि हे खत (Kapus khat niyojan) (प्रमाण – प्रति एकर) वापरू शकता.
1) 10-26-26 1 एकर साठी, 1 किंवा दीड बँग
2) 20-20-00-13 1 एकर साठी दीड किंवा दोन बँग
3) 10-46-00 1 एकर प्रमाणे 1 – किंवा दीड बँग + 25 किलो पोटॅश
शेतकऱ्यांनो पुढील ४८ तास धोक्याचे, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, IMD चा या भागांसाठी धोक्याचा इशारा..
4) सामान्य सुपरफॉस्फेट 2 बँग आणि 25 किलो पोटॅश
तुम्ही वरीलपैकी कोणताही पर्याय निवडू शकता. खताची पहिली मात्रा (Kapus khat niyojan) लागवडीनंतर 20 दिवसांपेक्षा जास्त विलंबाने दिल्यास, वरील प्रत्येक पर्यायात 20 किलो युरिया मिसळा.