काय सांगता? विजेपासून ते गॅस सिलिंडर पर्यंत सर्व काही मिळणार मोफत! अर्थसंकल्पातील मोठी घोषणा

Budget Session 2024: राज्य सरकार द्वारे आज आपला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पामधे मोठ्या आणि ठोस तरतुदी केल्या जातील अशी अपेक्षा आहे. आज आम्ही तुमच्यासाठी याच अर्थसंकल्पामधील काही महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती घेऊन आलो आहोत. या अर्थसंकल्पामधे मुख्यमंत्र्यांच्या योजनांची छाप असल्याचे समजते.

अर्थमंत्री अजित पवार आज (28 जून) दुपारी अर्थसंकल्प (Budget Session 2024) सादर करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा अर्थसंकल्प मांडला जात असल्याने त्यात महत्त्वाच्या योजना जाहीर होण्याची शक्यता आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, युवा कौशल, मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि अन्नपूर्णा योजनेसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा या अर्थसंकल्पामधे केली जाण्याची शक्यता आहे. सर्व महिलांना अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला तीन मोफत सिलिंडर देण्यात येणार आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पातील (Budget Session 2024) योजना कोणत्या आहेत?

1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

उद्दिष्ट – आर्थिक आणि सामाजिक स्थिरता आणि राहणीमानात सुधारणा.

लाभार्थी – 21 ते 60 या वयोगटातील सर्व महिला ह्या या योजनेच्या लाभार्थी असतील.

अट: 2,50,500 रुपयांपेक्षा उत्पन्न हे कमी असले पाहिजे

या योजनेचा लाभ हा तब्बल 3 कोटी 50 लाख महिलांना मिळू शकतो.

प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळतील.

2. मुख्यमंत्री युवा कौशल्य (Budget Session 2024) योजना

7000 रु 12वी पास साठी

रु 8000 ITI डिप्लोमा साठी

9000 रु पदवीधरांसाठी

वय मर्यादा 18 ते 29 वर्षे असेल

3. अन्नपूर्णा योजना

प्रत्येक वर्षाला तीन मोफत सिलिंडर मिळतील

ही योजना सर्व महिलांना लागू होणार

4. मुख्यमंत्री बळीराजा ऊर्जा अनुदान योजना

कृषी पंपांसाठी मोफत ऊर्जा

7.5 HP ची मोटर असणाऱ्या छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल

याचा फायदा 44 लाख शेतकऱ्यांना (Budget Session 2024) होणार

सौरपंपांचे वाटप 8.5 लाख शेतकऱ्यांना होणार

52 लाख 50,000 एकूण लाभार्थी संख्या

येथे वाचा – ग्राहकांनो आता तुमचं क्रेडिट कार्ड वापरणं सुद्धा बंद! 1जुलैपासून RBI चा हा नवा नियम होणार लागू!

Leave a Comment