क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या डोक्याला ताप! SBI, HDFC सह या बँकांच्या कार्ड वापराच्या नियमात बदल..

Credit Card Update: जुलैमध्ये देशातील अनेक बँकांनी क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहेत. या बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि सिटी बँक क्रेडिट कार्ड यांचा समावेश झालेला आहे. 1 जुलै 2024 पासून हे नवीन नियम लागू होतील. आता या नियमांत नेमके काय बदल केले आहेत ते आता आपण जाणून घेऊ.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या लाखो ग्राहकांना कळवले आहे की 1 जुलै 2024 पासून काही क्रेडिट कार्डवरील, सरकारी व्यवहारांवर उपलब्ध असणारे रिवॉर्ड पॉइंट्स मिळणं बंद केले जाईल. यामध्ये कोणती कार्डे (Credit Card Update) समाविष्ट आहेत त्याची माहिती पुढे दिली गेली आहे.

ICICI bank क्रेडिट कार्ड

ICICI बँकेने 1 जुलै 2024 पासून क्रेडिट कार्डचे अनेक नियम बदलले आहेत. या प्रक्रियेत, एमराल्ड प्रायव्हेट मेटल क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व कार्डांसाठी कार्ड बदली शुल्क 100 रुपयांवरून 200 रुपये केले आहे.

शेतकऱ्यांनो सावधान, जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार..

Citi Bank क्रेडिट कार्ड

सिटी बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना ॲक्सिस बँकेने क्रेडिट कार्ड खात्यांसह सर्व प्रकारच्या स्थलांतराबद्दल माहिती दिली आहे. ही प्रक्रिया 15 जुलै 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. Axis Bank ने सांगितले आहे की, Citibank क्रेडिट कार्ड ग्राहकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, 15 जुलै 2024 पर्यंत सर्व कार्ड (Credit Card Update) स्थलांतर पूर्ण केले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.

स्थलांतरानंतर (वर्षाच्या अखेरीस), Citi-ब्रँडेड कार्ड, ग्राहकांना त्यांचे नवीन Axis Bank कार्ड प्राप्त होईपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय कार्य करत राहतील. स्थलांतराच्या तारखेपर्यंत मिळवलेले गुण कधीही समाप्त होणार नाहीत. मात्र, स्थलांतरानंतर मिळालेले गुण तीन वर्षांनी संपतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

HDFC क्रेडिट कार्ड

HDFC बँक लिमिटेड ने Paytm, cred, Cheque, Mobikwik आणि Freecharge सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे क्रेडिट कार्ड (Credit Card Update) वापरून भाडे भरण्यासाठी नवीन दर सादर केले आहेत. हे दर 1 ऑगस्ट 2024 पासून लागू होतील.

येथे वाचा – मुंबईकरांनो deposit तयार ठेवलंय ना? मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी म्हाडाच्या घरांची सोडत सुरू..

Leave a Comment