Mukhymantri mazi Ladki Bahin Yojna: महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची घोषणा केली होती ज्याद्वारे प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 दिले जाणार आहेत. मात्र या योजनेतील काही अटींमुळे अनेक महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नसल्यामुळे या योजनेतील या जाचक अटी काढून टाकणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वारे करण्यात आली आहे.
लाडकी बहिन योजनेतील ठरवण्यात आलेल्या जाचक अटींमुळे कितीतरी महिला अपात्र ठरणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाद्वारे पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला गेला. आता मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे (Mukhymantri mazi Ladki Bahin Yojna) 07 महत्त्वाच्या अटी रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबईकरांनो लवकरच मिळणार म्हाडाच्या घरांचा ताबा.. या भागातील घरांसाठी सोडत..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे लाडकी बहिन योजनेतील रद्द करण्यात आलेल्या काही अटी पुढीलप्रमाणे आहेत:
1) महिलांसाठी या योजनेत 21 ते 60 ही वयोमर्यादा निश्चित केली गेली होती, मात्र आता ही मर्यादा 60 वरून 65 वर्षे केली गेली आहे.
2) कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास कुटुंबातील महिलांना वगळण्यात आले होते; आता मात्र ही अट शिथिल केली गेली आहे.
3) या योजनेचा (Mukhymantri mazi Ladki Bahin Yojna) लाभ घेण्यासाठी असलेली अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 जुलै होती जी आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली गेली आहे. अर्जाचा कालावधी दोन महिन्यांचा असेल.
4) पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
5) लाभार्थी महिलेकडे 15 वर्षापूर्वीचे रहिवासी प्रमाणपत्र नसल्यास, मतदार ओळखपत्र, शाळा पूर्ण झाल्याचा दाखला, जन्म दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे शिधापत्रिका ग्राह्य धरण्यात येईल.
6) कुटुंबातील लग्न झालं नसलेल्या एका महिलेलाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सरकारच्या लाडकी बहिन योजनेच्या (Mukhymantri mazi Ladki Bahin Yojna) नवीन निर्णयानुसार महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै महिन्याचे पैसेही मिळतील.
येथे वाचा – काय सांगता! सोयाबीनचे पीक धोक्यात, त्वरित करा ‘हा’ उपाय.. नाहीतर उत्पादन होईल कमी..!