Crop Insurance: सरकारने शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पिक विमा देण्याची घोषणा तर मोठ्या उत्साहात केली होती. मात्र यामुळे शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसानभरपाईत काही एक फरक पडला नाही. छत्रपती संभाजीनगरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना फक्त 70 ते 73 रुपयेच नुकसान भरपाई दिली गेली आहे.
शेतकऱ्यांच्या मोबाईलवरही असे काही मेसेज आले आहेत. आधीच शेतीमालाला भाव मिळत नाही, नैसर्गिक आपत्ती सुद्धा आहेच आणि त्यात सरकार आणि विमा कंपन्याही शेतकऱ्यांची खिल्ली उडवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. पीक विम्याची 70 रु. रक्कम तर आली मात्र यासाठी बँकेत 1000 रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे.
या घटनेची प्रशासकीय पातळीवर दखल घेतली जात नसल्याचे शेतकऱ्यांनी एका वृत्त वाहिनिशी बोलताना सांगितले. 70 ते 80 रुपये नुकसान भरपाई (Crop Insurance) ही छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्यामधील काही गावातील शेतकऱ्यांना मिळाली आहे.
शेतकऱ्यांनो कापसाला खताचा पहिला डोस हाच द्या.. उत्पादन होईल दुप्पट..
हा मेसेज शेतकऱ्याच्या मोबाईलवर आल्याचे समोर आले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात मेटाकुटीला आलेल्या सरकार आणि विमा कंपन्यांनी थट्टा केली असल्याचं चित्र दिसून येत आहे.
70 रुपयांचा पीक विमा (Crop Insurance), काढण्यासाठी एक हजार रुपये बँक खात्यात जमा करावे लागतील
छत्रपती संभाजीनगर येथील एका शेतकऱ्याने सांगितले, ‘मला पीक विम्याचे 70 रुपये मिळाले आहेत. परंतु खात्यातून पैसे काढण्यासाठी खात्यात 1000 रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे. पीक विमा खात्यात जमा केल्यामुळे खात्यातील शिल्लक 500 रुपये झाली आहे. आता 70 रुपये काढण्यासाठी 500 रुपये जमा करावे लागतील, ते कुठून आणू? असही ते पुढे म्हणाले आहेत.
73 रुपये आणि 71 पैशांच्या विमा रकमेचे (Crop Insurance) काय करू? तीन मजल्यांची माडी बांधू का? संतप्त शेतकऱ्याने सरकारला केला सवाल..
शेतकऱ्यांनो, या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झाली.. एका क्लिकवर पहा जिल्ह्यांची यादी..
वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकरी भरत कारभारी तुपे यांच्याकडे दोन एकर शेतजमीन आहे. गतवर्षी त्यांनी या शेतात एक एकरात मका लावला होता. मका पिकाला एकरी 30 हजार रुपये खर्च आला. मात्र नैसर्गिक आपत्तींमुळे या पिकाचे उत्पादन घटले. भाव देखील कमी झाला. हे विकून त्यांना 14,400 रुपये मिळाले, म्हणजे 15,600 रुपयांचे नुकसान झाले. नुकसान झाल्याची तक्रारही त्यांनी केली, पण त्यांच्या खात्यात 73 रुपये 71 पैसे विम्याची (Crop Insurance) रक्कम जमा झाल्याचा संदेश आला. आता या पैशाचे करायचे काय? तीन मजली माडी बांधावी का? असा सवाल त्यांनी थेट सरकारला केला आहे.
दरम्यान, पावसाअभावी बळीराजाच्या चिंतेत भर पडल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत सरकारने मोठ्या थाटामाटात चिंतेने ग्रासलेल्या बळीराजासाठी एक रुपयाचा विमा (Crop Insurance) जाहीर केला. मात्र छत्रपती संभाजी नगर येथील शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर मिळालेली रक्कम पाहिली असता शासनाने शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे दिसून येते.
येथे वाचा – शेतकऱ्यांनो, खतांच्या किमतीत एवढ्या रुपयांची घसरण.. आजपासून नवीन दर लागू..