पीक कर्ज काढलेल्या शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता शेतकर्‍यांचा होणार फायदा..!

Crop Loan : राज्य सरकार वारंवार शेतकर्‍यांसाठी महत्वाचे निर्णय घेत असते. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळत असतो. अलीकडेच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकर्‍यांनी पीक कर्ज (Crop Loan) घेतलेले आहे अशा शेतकर्‍यांसाठी हा महत्वाचा निर्णय आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 1.6 लाख रुपयांचे पीक कर्ज (Crop Loan) घेतले आहे आता अशा शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क (Stamp duty) माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक ओझे कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्ज (New Crop Loan) घेण्याअगोदर 500 रुपये एवढे मुद्रांक शुल्क भरले होते आता अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारांतर्गत महसूल आणि वन विभागाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे 1 एप्रिल 2024 रोजी किंवा या तारखेनंतर घेतलेल्या सर्व नवीन पीक कर्जाची माफी लागू असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 जुलैपर्यंत जमा होणार पैसे! येथे क्लिक करून पहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी

राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा लाभ मिळणार आहे. जे शेतकरी त्यांच्या शेती कामासाठी छोटे कर्ज काढतात, आता अशा शेतकर्‍यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. महाराष्ट्र सरकारने हे मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांच्या 1.6 रुपये पर्यंतच्या पीक कर्जासाठी माफ केले आहे. आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नक्कीच शेतकर्‍यांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.

अरे वा! आता ‘या’ नागरिकांना मोफत उपचार; येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment