महिलांनो रोज फक्त 4 तास काम करा आणि कमवा ₹11,000 पगार.. महिलांसाठी अर्धवेळ कामाची नवी योजना!

Ardhvel kamachi Yojana Maharashtra: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी आणखी एक महत्त्वाची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी नव्याने येणाऱ्या अर्धवेळ कामाच्या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. याअंतर्गत महिलांना दिवसाला फक्त चार तास काम करून ₹11,000 पगारासह मोफत नाश्ता आणि जेवण मिळणार आहे. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मोठा आधार ठरणार आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | स्त्रियांना आर्थिक आधार

माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे राबवल्यानंतर राज्य सरकार आता महिलांना अर्धवेळ रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. याअंतर्गत सध्या 2 कोटी 30 लाख महिलांना दरमहा ₹1,500 अनुदान दिले जात आहे. सरकारने अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली असल्याने हा आकडा लवकरच 2.5 कोटींवर पोहोचेल.

“या” शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात.. जाणून घ्या सविस्तर!

अर्धवेळ कामाच्या नव्या योजनेत महिलांना आर्थिक स्वावलंबन | Government Part Time Jobs For Women

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार, टाटा कंपनीच्या सहकार्याने या योजनेची अंमलबजावणी सुरू होत आहे. यामध्ये महिलांना दिवसाला फक्त 4 तास काम करावे लागणार असून ₹11,000 पगार मिळणार आहे. एक वेळचे मोफत जेवण आणि नाश्ता सुद्धा योजनेअंतर्गत दिला जाणार आहे. या योजनेमुळे घर चालवणाऱ्या, कुटुंबाचा आधार असलेल्या आणि विविध कारणांमुळे पूर्णवेळ नोकरी करू न शकणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळेल.

Part Time Jobs for Women in Maharashtra | टाटा कंपनीकडून सुरुवात

या योजनेची अंमलबजावणी सर्वप्रथम टाटा कंपनीतून सुरू होणार असून हळूहळू इतर क्षेत्रांमध्येही ती विस्तारली जाईल. गरजू महिलांसाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा बदल ठरणार आहे. महिलांना कमी वेळात चांगला पगार आणि इतर सुविधा मिळणार असल्याने त्यांच्यात उत्साह निर्माण झाला आहे.

लाडक्या बहिणींसाठी 5500 रुपयांचा दिवाळी बोनस!, जाणून घ्या पात्रता आणि महत्त्वाची माहिती

राज्यातील अनेक महिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहेत. अशा महिलांसाठी अर्धवेळ नोकरीची संधी मोठा आधार ठरणार आहे. घरातील जबाबदाऱ्या सांभाळून महिला आता चार तास काम करून स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. टाटा कंपनीच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या या योजनेमुळे महिलांना नोकरीचा अनुभव मिळेल आणि भविष्यात मोठ्या संधी देखील उपलब्ध होतील.

राज्य सरकारच्या या योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाचा आत्मविश्वास निर्माण होणार आहे. पार्ट टाईम जॉब आणि ₹11,000 पगारासोबत मोफत जेवण आणि नाश्ता या सुविधेमुळे अनेक महिलांचे जीवनमान सुधारेल. महिलांना कमी वेळेत नोकरी मिळाल्यामुळे त्या घर सांभाळून सुद्धा अर्थार्जन करू शकतील.

राज्य सरकारची महिलांसाठीची अर्धवेळ कामाची योजना ही महिलांना फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यापुरतीच मर्यादित नाही तर त्यांना आत्मनिर्भरतेचा मार्गही दाखवते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या योजनेची घोषणा करून महिलांना आशावादी वाटा दाखवली आहे. योजनेची सुरुवात टाटा कंपनीतून होत असून लवकरच इतर क्षेत्रांतही योजनेचा विस्तार होईल, याचा फायदा लाखो महिलांना होईल.

Leave a Comment