लाडकी बहिण पाठोपाठ आता लाडका भाऊ योजनेला मंजुरी… दरमहा 10 हजार मिळणार?

Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण राज्य सरकारच्या (State Government) या योजनेवरून सध्या राज्यात राजकीय गदारोळ पाहायला मिळत आहे. महायुती सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून या योजनेचे अर्ज भरण्यासाठी सेतू कार्यालय व संबंधित कार्यालयासमोर महिलांनी एकच गर्दी केली आहे.

त्यामुळे राज्य सरकारने ही योजना अधिक चांगली, सोपी आणि अधिक सुलभपणे लागू करण्यासाठी नियमांमध्ये काही अनुकूल बदलही केले आहेत. दुसरीकडे या योजनेचे स्वागत करतानाच विरोधकांनीही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहातूनच पलटवार केला असल्याचे बघायला मिळत आहे.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती दिली. सरकारच्या या निर्णयाची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा होत आहे.

म्हाडाच घर घेताय? ही कागदपत्रे ठेवा तयार.. अन्यथा मिळणार नाही घराचा ताबा..

मात्र, या योजनेचे स्वागत करत असतानाच, उद्धव ठाकरे (Uddhav thackeray), शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री यांनी सत्ताधाऱ्यांना टोमणा सुद्धा लगावला होता. प्रिय भगिनींसाठी ही योजना स्वागतार्ह आहे, पण प्रिय भावांसाठीही ही योजना आणली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. सध्या यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी पलटवार केला आहे.

काही लोक असं म्हणाले आहेत की लाडक्या बहिणीच तर झालं, पण आता लाडक्या भावाचे काय? उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर देत म्हटले की, जे सख्खे भाऊ समजू शकले नाहीत, त्यांना लाडकी बहिण योजनेची काय माहिती असेल? बरं, आम्हीही ते सुद्धा केलं आहे.

लाडक्या भावांबद्दल देखील आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही राज्यातील 10 लाख मुलांना अप्रेंटीशिप देत आहोत, या तरुणांना दरमहा 8,000 ते 10,000 रुपये मिळणार आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) सांगितले.

दोन लाखांहून अधिक कर्जदारांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी कधी?

फोटोग्राफर म्हणून ठाकरे यांना लगावला टोला

महिलांमध्ये सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन (Mukhymantri Ladki Bahin Yojana) योजनेमुळे प्रचंड आनंदाचे वातावरण असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडत आहे. या गर्दीचा फोटो काढलाच पाहिजे; खरे तर या इथेही काही चांगले फोटोग्राफर आपल्याला बघायला मिळतील. उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्यांनी रियल फोटो सोडून जमिनीवरील फोटो सुद्धा काढावेत, कारण गर्दी पाहिल्यानंतर त्यांचे चेहरे देखील नक्कीच फोटो काढण्यासारखे होतील.

Leave a Comment