PM Kisan samman: पहिल्याच दिवशी मोदी 3.0 सरकारद्वारे, पहिला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे. सोमवारी या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता हा जारी करण्यात आला आहे. देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हा हप्ता जमा झाला.
तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली. मोदी 3.0 सरकारच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी पहिला निर्णय (PM Kisan samman) घेण्यात आला आहे. सोमवारीच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता हा जारी करण्यात आला आहे. दोन हजार रुपयांचा हा हप्ता देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला.
काय सांगता? आता नोटांवर महात्मा गांधीं ऐवजी या नेत्याचा फोटो झळकणार!
ही योजना नरेंद्र मोदी 2 सरकारने केली होती सुरू
नरेंद्र मोदी 2 सरकार द्वारे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी 6,000 रुपयांची मदत या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे. याअंतर्गत दर चार महिन्यांनी 2,000 रुपये वितरित केले जातात. केंद्राचे उदाहरण घेत राज्य सरकारनेही ही योजना (PM Kisan samman) सुरू केली आहे. 6,000 रुपये आता राज्य सरकार द्वारे सुद्धा देण्यात येत आहेत. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र आणि राज्य सरकार मिळून दरवर्षी 12 हजार रुपये जमा होणार आहेत.
खूशखबर! आता महिलांना फक्त 450 मधे मिळणार गॅस सिलिंडर
मोदी सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी
तिसऱ्यांदा सूत्रे स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पहिला निर्णय घेतला आहे. सगळ्यात आधी किसान सन्मान निधीचा (PM Kisan samman) हप्ता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केला आहे. देशभरातील तब्बल 9.3 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, तसेच आम्ही कृषी क्षेत्रासाठी काम करत राहू असही ते पुढे म्हणाले आहेत.