Cheap Home Loan : मागील काही वर्षांपासून प्रॉपर्टीची मागणी खूपच वाढली आहे. लोक मोठ्या प्रमाणात अलिशान घरे (Luxury Homes) खरेदी करत आहे. घरांच्या वाढलेल्या मागणीमुळे किमती देखील भरमसाठ वाढल्या आहेत. तरी देखील लोक अलिशान घरे खरेदी करत आहे. जर आजच्या काळात तुम्हाला मुंबई आणि पुण्यात घर (1BHK Flats Mumbai) घ्यायचे असेल तर 40 ते 50 लाखाची रक्कम तुमच्याकडे असायला हवी. पण अशात आता नवीन घर (News Home) खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण अलीकडेच वेगवेगळ्या बँकांनी (Bank) आपल्या होम लोनच्या (Home Loan) व्याजदार चांगलीच कपात केली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं आता होम लोन घेणार्या ग्राहकांचा फायदा होणार आहे.
बँकेकडून होम लोन घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे (Home Loan Documents) जमा करावी लागणार आहे. यात आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखल, वयाचा पुरावा आणि ड्रायव्हिंग लायसन ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहे. त्यानंतर बँका तुम्हचे होम लोन मंजूर करतील. कोणकोणत्या बॅंका कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे, यासंदर्भात माहिती जाणून घेऊया..