Farmer Loan Waiver Scheme: पुढील विधानसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारकडून (central government) आणखी एक मोठी घोषणा करण्यात येणार आहे. असं बोललं जात आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यामधील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असून, ही कर्जमाफी (loan waiver) सुमारे 938 आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या घोषणेने दिलासा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजनांच्या घोषणा
विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना जाहीर करत आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री माझी (majhi ladki bahin) लाडकी बहीन या योजनेची घोषणा केली होती.
या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील. तसेच तरुणांसाठी सुद्धा लाडका भाऊ नावाची योजना सुरू करण्यात आली आहे. याद्वारे 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6000 रुपये, आयटीआय आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना 8000 रुपये आणि पदव्युत्तर तरुणांना दरमहा 10000 रुपये दिले जाणार आहेत.
शेतकर्यांनो! सरकारी मदत पाहिजे का? तर मग मोबाईल वरून लगेच करा ‘हे’ एक काम..!
वित्त विभागाद्वारे हालचालींना वेग
यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी मोठी घोषणा करणार असल्याचं समजून येत आहे. यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी (Farmer Loan Waiver Scheme) मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाने याबाबत काम सुरू केले आहे.
अजून अधिकृत घोषणा नाही
आदिवासी समाजातील सुमारे 938 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा याबाबत करण्यात आलेली नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी (Farmer Loan Waiver Scheme) कधी जाहीर करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
काय सांगता! या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ५ हजार रुपये.. नवीन GR निघाला…
३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा विचार – अब्दुल सत्तार
दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी कर्जमाफीबाबत वक्तव्य केले होते. “आम्ही सरकारला कर्जमाफी करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू शकते का, याबाबत सरकारने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. अब्दुल सत्तार म्हणाले होते की, सरकार याकडे सहानुभूती पूर्वक बघत आहे. आता खरंच हा मुद्दा समजून शेतकऱ्यांचे कर्ज माफ (loan waiver) होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.