MHADA House: ऑगस्ट 2023 मध्ये मुंबई मंडळाने लॉटरी काढली होती. विक्रोळीतील अल्पसंख्याक गटातील 258 घरांचा सोडतीत समावेश करण्यात आला होता. 36 लाख 16 हजार रुपये अशी या घरांची विक्री किंमत होती. मुंबई मंडळाने नोव्हेंबर-डिसेंबरपासून विजेत्यांना ही घरे देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 207 विजेत्यांनी घराचा ताबा घेतला असून, घरात प्रवेश सुद्धा केला आहे. पण पहिल्याच पावसाने अनेक घरांमध्ये गळती सुरू झाली असल्याचं दिसून येत आहे.
विजेत्यांना नवीन इमारतींमधील घरांमधील गळतीबद्दल चिंता आहे. स्थानिक रहिवाशांनी संबंधित ठेकेदाराकडे तक्रारही केली होती. मात्र, कारवाई झाली नाही. विक्रोळीतील म्हाडाच्या नवीन इमारतींना गळती लागल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई मंडळाला अचानक जाग आली. मुंबई मंडळाचे (Bombay Board) अध्यक्ष मिलिंद बोरीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने योग्य ती दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार दुरुस्तीचे काम सुरू झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
लाडकी बहीण योजनेत 2 मोठे बदल.. या मुख्य अटी रद्द..
या इमारतींची दुरुस्ती मुंबई मंडळाने सुरू केली आहे. यासोबतच मुंबई मंडळाने या इमारतींची आयआयटी पवईमार्फत तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याचे यांनी सांगितले. विजेत्यांनी स्वच्छतागृहांचे नूतनीकरण केले आहे. एसी बसवण्यासाठी भिंतींना मोठे छिद्र पाडण्यात आले आहेत. फरशा बदलण्यात आल्या आहेत. हा बदल गळतीला कारणीभूत असल्याचे मुंबई बोर्डाचे ठाम पणे सांगितले आहे. त्यामुळे घरामध्ये करण्यात आलेल्या या बदलांमुळेच इमारतींचे किती आणि काय काय नुकसान झाले आहे, याचा तपास आता आयआयटी करणार असल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले.
अंतर्गत बदलांमुळे घरात गळती होत असल्याचा मुंबई बोर्डाचा दावा रहिवाशांनी फेटाळला. निकृष्ट बांधकामामुळे घराला गळती लागली आहे. या घरामध्ये काही रहिवाशांनी अंतर्गत बदल देखील केले आहेत. पण रहिवाशांना आश्चर्य वाटते की बऱ्याच घरांना (MHADA House) गळती कशी काय लागली आहे.
मुंबईकरांनो लवकरच मिळणार म्हाडाच्या घरांचा ताबा.. या भागातील घरांसाठी सोडत..
गळतीचे वृत्त आल्यानंतर मुंबई मंडळाच्या संबंधित विभागाने विक्रोळीतील घरांची पाहणी केली असता एकूण 207 पैकी 96 घरांमध्ये बरेच काही बदल झाल्याचे आढळून आले. 34 घरे बंद असल्यामुळे त्यांची तपासणी होऊ शकली नाही, असे बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या अधिकाऱ्याने असेही सांगितले की 96 घरांमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत बदल केले असल्याने ही एक मोठी समस्या आहे आणि सदोष बदलांमुळे गळती होत आहे.
घरात (MHADA House) बदल करणारे नागरिक संकटात, मंडळाने पाठवली नोटीस
ज्या विजेत्यांनी नवीन घरामध्ये अंतर्गत बदल केला आहे त्यांना आता नोटीस देण्यात आली आहे. आता अशा विजेत्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बोर्डाच्या नोटीस बजावण्याच्या निर्णयावर रहिवाशांनी नाराजी व्यक्त करत इमारतींच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असताना रहिवाशांना त्रास का दिला जात आहे, असा आक्षेप घेतला आहे.
येथे वाचा – क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या डोक्याला ताप! SBI, HDFC सह या बँकांच्या कार्ड वापराच्या नियमात बदल..