Monsoon update: महाराष्ट्रात सर्वत्र मान्सून पसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असल्याचं बघायला मिळत होत. मात्र आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून हवामान खात्याने (IMD) आज राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत दक्षिण कोकण जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अति मुसळधार (Monsoon update) पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे.
विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाद्वारे देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनो, कापसासाठी वापरा हे तणनाशक, तणांचा प्रादुर्भाव कधीच होणार नाही..
विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. अद्याप पाऊस न झाल्याने विदर्भात दमदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, या ठिकाणी येत्या 24 तासांत ढगाळ वातावरण राहील आणि हवामान खात्याने मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज (Monsoon update) वर्तवला आहे. मुंबईत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 26 जून रोजी हवामानाचा नवा अंदाज दिला आहे. विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी पाऊस कधी जोर धरेल आणि पावसाची जुलैमध्ये नेमकी काय स्थिती असेल याची माहिती या अंदाजामधे देण्यात आली आहे.
काय सांगता? फळ पिकांसाठी प्रति हेक्टरी तब्बल इतका फळ विमा मिळणार, असा करा अर्ज..
अंदाजानुसार विदर्भात 27 जूनला पाऊस सुरू होईल आणि मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात 28 ते 29 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 जूनपासून विदर्भात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस अपेक्षित आहे आणि तो 6 जुलैपासून सुरू राहील
27, 28 आणि 29 जून रोजी विदर्भात पावसाला सुरुवात होईल. तीन दिवस बहुतांश भागात पाऊस पडेल. विदर्भ आणि मराठवाड्यामधे एक प्रकारे पावसाचे प्रमाण फारच असल्याने शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची (Monsoon update) अपेक्षा आहे. जुलैमध्ये अतिवृष्टीचा अंदाज असून पंजाबराव डख यांनी काही शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे.
येथे वाचा – शेतकऱ्यांनो खूशखबर, अबकी बार सोयाबीन 10,000 पार.. बघा सोयाबीनचा आजचा भाव..