Annapurna Yojana: जसे की आपण जाणतोच, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प काल अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याद्वारे सादर करण्यात आला. अजित पवार यांनी या अर्थसंकल्पामधे मोठी घोषणा केली असल्याचं बघायला मिळत आहे. घरगुती गॅस सिलेंडर बद्दल ही घोषणा केली गेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत राज्य सरकारद्वारे तीन घरगुती गॅस सिलिंडर हे पात्र असणाऱ्या नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 56 लाखांहून जास्त कुटुंबांना या गोष्टीचा फायदा घेता येणार आहे.
अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार काय म्हणाले होते?
स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे इंधन आणि महिलांचे आरोग्य यांचा खोलवर संबंध आहे. महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करायच्या असतील, तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवण्याची जबाबदारी आपली आहे. या संदर्भात, एलपीजीचा वापर हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जात असल्याने त्याचा वापर आणि पुरवठा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत दिले (Annapurna Yojana) जातील, जेणेकरून सर्वांना गॅस सिलिंडर परवडतील असे मी जाहीर करत आहे.”
कोणत्या कुटुंबाला तीन सिलिंडर मिळणार?
अजित पवारांची ही घोषणा महत्त्वाची आहे. सिलिंडरची किंमत वाढली की सर्व सामान्य कुटुंबाचे मासिक बजेट कोलमडते. वाढत्या खर्चामुळे नियोजन काळजीपूर्वक करण्याची गरज पडते. ही योजना दारिद्र्यरेषेखालील बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबांना विना अडथळा लाभ देईल. पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना देखील या सिलिंडर (Annapurna Yojana) प्रणालीचा लाभ मिळणार आहे. अल्प उत्पन्न व त्याहून उत्पन्न गटाला त्याचा लाभ मिळेल. लाभार्थी कुटुंबाच्या खात्यात तीन सिलिंडरचे पैसे जमा केले जातील. या योजनेचा लाभ 56 लाखांहून जास्त कुटुंबांना होणार आहे.
महाराष्ट्रात 600,000 पेक्षा जास्त महिला बचत गट आहेत
6,00,000 पेक्षा जास्त महिला बचत गट महाराष्ट्रात आहेत आणि त्यांची संख्या 7,00,000 पर्यंत वाढवण्यात येईल. तसेच त्यांना मिळणाऱ्या निधीची रक्कम 15,000 रुपयांवरून 30,000 रुपयांपर्यंत वाढवली गेली आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, छोट्या महिला व्यावसायिकांनी घेतलेल्या 15 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज परत करण्यासाठी सरकारने आई योजना सुरू केली आहे.100 विशेष जलदगती न्यायालयांना, महिला आणि बालकांवरील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी आवश्यक निधी (Annapurna Yojana) उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी पुढे दिली आहे.
येथे वाचा – काय सांगता? या घरांच्या किमती 10 लाखांनी वाढल्या.. म्हाडा मुंबई मंडळाचा मोठा निर्णय!